सांगली,(प्रतिनिधी)-
शिक्षक
दिनाचे औचित्य साधून दिले जाणारे जिल्हा शिक्षक व जिल्हा गुणवंत पुरस्कार शिक्षक दिनाच्या
पूर्वसंध्येला जाहीर झाले. शिक्षक दिनानंतर तब्बल सहा महिन्यांनी
पुरस्कार देण्यात येत आहेत. त्यामध्ये शिक्षण विभागाने ऐनवेळी
गोंधळ केल्याचे समोर आले आहे. 4 सप्टेंबरला 18 पुरस्कार जाहीर करताना 12 आदर्श शिक्षक व 10 गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. मात्र
आज होणार्या कार्यक्रमासाठी चार दिवसांपूर्वी नव्याने यादी जाहीर
झाली.
यामध्ये कन्नड व उर्दू माध्यमच्या शिक्षकांना आदर्श शिक्षकऐवजी
गुणवंत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हा अचानक बदल का व कोणासाठी
केला, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
मिनी मंत्रालयाच्यावतीने चांगली कामगिरी करणार्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात येतात. प्रत्येक तालुक्यातून
प्राथमिक शाळेतील एक आणि कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या प्रत्येकी एका शिक्षकालापुरस्कार
देण्याची पध्दत मागील वर्षीपर्यंत सुरू होती. यंदाही त्याच पध्दतीने
पुरस्कार जाहीर करण्यात आले. मात्र परत बदल करण्यात आले.
नजीरअहम्मद शमशउद्दीन बागसीराज (वड्डी,
उर्दू) व राजेंद्र गुरुबसप्पा बिरादार
(जालिहाळ बु, कन्नड) यांना
आदर्श ऐवजी आता गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा बदल कसा झाला? आदर्श शिक्षक गुणवंत कसे झाले,
यावरून जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिक्षण
विभाग व यामधील अधिकारी - कर्मचारी कायमच चर्चेत असतात.
या प्रकाराने त्यामध्ये आणखी भर पडली आहे. गुणवंत
पुरस्कार कोणाच्या सोयीसाठी? आदर्श शिक्षक पुरस्काराचा पुरता
बोर्या वाजवला आहे. पूर्वी हा पुरस्कार
मिळणार्या शिक्षकास वेतनवाढ मिळत होती, तीही बंद झाली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीत पारदर्शकता
किती राहिली आहे, हा संशोधनाचा भाग आहे. या सर्व खटाटोपात काही शिक्षक पुरस्कारापासून दूर राहतात, ते नाराज होऊन आपलं सर्वच बिंग फुटू नये म्हणून त्यापैकीच काहींना गुणवंत पुरस्कार
देऊन शांत केल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. हे
गुणवंत पुरस्कार नेमकं कोणाच्या सोयीसाठी असा प्रश्न निर्माण
झाला आहे.
No comments:
Post a Comment