Thursday, March 7, 2019

महिला दिन


 महिला या सुध्दा मनुष्यच आहेत आणि त्यांनाही मानवाप्रमाणे जगण्याचा हक्क व अधिकार आहे, याची जाणीव महिलांना व्हावी, यासाठी महिला दिन साजरा केला जातो. कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान करून देशात महिला सशक्तीकरणाची उदाहरणे दिली जातात. आधुनिक काळात महिला कशा पध्दतीने घर व ऑफीस सांभाळून आहेत, याचे उदात्तीकरण केले जाते. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कशा वावरतात, ते समाजापुढे मांडले जाते. परंतु सामजिक क्षेत्रात पुढे आलेल्या स्त्रियांची संख्या किती आहे??? अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी! कोणतेही क्षेत्र घ्या, ठराविकच नावे चटकन डोळ्यांसमोर येतात.
काही मोजक्याच महिला समाजाचे प्रतिनिधित्व करतात, यात तिळमात्र शंका नाही. परंतु या स्त्रिया व्यतिरिक्त समाजामध्ये सर्वसामान्य स्त्री म्हणून जीवन जगणार्याचं काय?? यासाठी सर्वसामान्य स्त्रीने देखील स्वतःला सिध्द करणे गरजेचे आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी आहे. यांत महिलांचे प्रमाण 50 टक्के आहे. महिलांमधील मनुष्यबळ वाया न जाता त्यांना देशाच्या विकासात सामावून घेतले तर देशाची प्रगती इतर विकसित देशाप्रमाणे होईल. चकोरीबाह्य मार्ग स्वीकारून महिला वर्गाने आपल्या आवडीनिवडी जपायला हव्यात. घरासाठी असणारी असणारी जबाबदारी पार पाडत स्वतः मधीलतीही जिवंत ठेवायला हवी. तिला सन्मान मिळवून देणं तिच्याच हाती आहे. शासकीय योजना, कायदे त्यांचं काम करत आहेत. स्त्रियांनी स्त्रियांना प्रोत्साहन देऊन स्त्री सबलीकरण त ळ ा ग ळ ा प यर् ं त नेण्याची गरज आहे. समाजात एकीकडे स्त्री सबलीकरणाचे पुरावे दिले जात असताना माझीच कोणीतरी बहीण कौटुंबिक हिंसाचाराला रोज बळी पडत आहे. पदरात दोन जीव, त्यांचं भविष्य काय असेल जर तिने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला तर या भीतीने ती ते सहन करत आहे. आजही स्वतःला उच्चभ्रू समजणारे लोक मुलगा हवा म्हणून स्त्रीभ्रूणहत्येसारखं पातक करताना दिसतात. बलात्कार, ॅसिड हल्ला, विनयभंग या घटना तर रोजच्या झाल्या आहेत. गरज आहे स्त्रीला सन्मान व आदर देण्याची भावना. प्रत्येक घरापासून सुरू व्हावी अगदी लहान वयातच ते संस्कार व्हावेत. आयुष्यभर वडील, भाऊ, पती, मुलगा यांच्या आधारे व सल्ल्याने त्या जीवन व्यतीत करत आहेत. स्त्रीला स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे हे मान्य करूया. परंपरा काळाप्रमाणे बदलूया. घरातील, समाजातील प्रत्येक स्त्रीला आदर, सन्मान देऊया तरच हा जागतिक महिला दिन साजरा झाला, असे म्हणता येईल.

No comments:

Post a Comment