Tuesday, March 26, 2019

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : अप्पर पोलीस अधीक्षक


जत,(प्रतिनिधी)-
 लोकसभा निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेची कडकपणे अंम लबजावणी करणार आहे. राजकीय पक्षांसह सर्वच घटकांनी पालन करावे; अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी माहिती सांगलीचे अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिली.

जत येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित सर्वपक्षीय पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, तुकाराम माळी, बसवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, रिपाइंचे संजय कांबळे मदन माने-पाटील, सामाजिक कार्यकर्ते गणेश गिड्डे आदी उपस्थित होते. बोराटे म्हणाले, छोटी-मोठी परवानगी काढण्यासाठी एक खिडकी व्यवस्था करण्यात आली आहे. कोणाला तक्रार करायची असेल तर 1950 या टोल फ्री नंबरवर करू शकता. पुराव्यांसह तक्रार करायची असेल तरसी-व्हिजिलॅपवर अपलोड करून पाठवू शकता. त्यावर 100 तासांच्या आत कारवाई करण्यात येईल. रात्री 10 नंतर हॉटेल बंद करण्यात यावे. परवानगीशिवाय वाहनांवर कोणत्याही नेत्याचे किंवा पक्षाचे फोटो लावू नये, सोशल मीडियावर धमकी देणे, शिवीगाळ करणे, चारित्र्यहनन करणे, या सर्व आचारसंहिता भंग करणार्या बाबी आहेत. यावर पोलीस यंत्रणा कटाक्षाने लक्ष ठेवून आहे. आचारसहितेत अडथळा आणणार्या 5 लोकांना हद्दपार करणार आहोत. 180 कलमांतर्गत 100 पैकी 78 लोकांवर कारवाई केली आहे. 19, 110, 144, 53 कलमान्वये अंतर्गत 160 लोकांवर कारवाई केलो आहे.

No comments:

Post a Comment