Saturday, March 30, 2019

सांगली लोकसभा चौरंगी होणार का?


जत,(प्रतिनिधी)-
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असलेला सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने आघाडीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानीला सोडल्याने काँग्रेसची नाचक्की झाली असताना सांगलीच्या वसंतदादा पाटील घराण्यातील विशाल पाटील यांना पहिल्यांदाच काँग्रेसशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागल्याने या घराण्यावरदेखील मोठी नामुष्की ओढवली आहे. विशाल पाटील यांना स्वाभिमानीची बॅट घेऊन लढावे लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश शेंडगे आणि अपक्ष म्हणून गोपीचंद पडळकर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने चौरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जिल्ह्यासह जत तालुक्यात सुरूवात झाली असून भाजप शिवसेना युतीच्यावतीने विद्यमान खासदार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आणि ऐतिहासिक  औदुंबर येथून प्रचाराचा शुभारंभ केला असून जिल्ह्यासह तालुक्यातील भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. आता काँग्रेस आघाडीच्या पक्षांमध्येदेखील आता उत्साह संचारला आहे. काँग्रेसला उमेदवारी मिळाली नसली तरी आघाडीच्या 56 पक्षातील राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला ही जागा सोडण्यात आली आहे. वसंतदादा घराण्यातील विशाल पाटील यांनी प्रथमच काँग्रेसची साथ सोडून स्वाभिमानीची बॅट घेऊन मैदानात उडी घेतली आहे.  धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून कोणत्याही परिस्थितीत गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या आखाड्यात उभारणार असल्याचे सांगितले जात आहे. स्वत: पडळकर यांनीदेखील तशी घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे चौरंगी लढतीची अपेक्षा केली जात आहे.
जत तालुक्यात ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत निवडणुकीची रणधुमाळी मात्र चांगलीच रंगणार आहे. एकिकडे दुड्ष्काळ तर दुसरीकडे निवडणुकीचा ज्वर यात जतच्या नागरिकांची मात्र होरपळ निश्चित आहे. जनावरांच्या चार्याचा मोठा प्रश्न गंभीर बनत चालाल आहे. 120 गावांपैकी सध्या 70 गावांना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. येत्या काही दिवसांत गावांची शंभरी गाठली जाईल, असे सांगितले जात आहे. अशातच सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता अंतिम टप्प्यावर आली आहे. सत्ताधारी भाजप शिवसेना युतीचे उमेदवार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराचा शुभारंभ करून राजकारणाचा पहिला अंक पूर्ण केला आहे. इकडे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व गोपीचंद पडळकर यांनी अद्यापही आपली उमेदवारी दाखल केली नाही. धनगर समाजाच्या वतीने गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. हे नेते मैदानात उतरले तरच जत तालुक्यात सांगली जिल्ह्यात जोरदार लढत होणार आहे.
 जत तालुक्यात भाजपने सांगली लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. तालुक्यात भाजपची ताकद मोठी असली तरी खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे यांच्या उपस्थितीत चार दिवसांपूर्वी झालेल्या दोन मेळाव्यात भाजपचा वाद चव्हाट्यावर आला. आमदार विलासराव जगताप यांचा गट डॉ. रवींद्र आरळी आणि तम्मनगौङा रवी पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जोरदार मेळावे घेऊन आपली ताकद दाखवून दिली. जिल्ह्यात जरी भाजपचे नेत्यामधील त्यांच्यातील मतभेद मिटले असले, तरी दोन्ही गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. तरी हे दोन्ही गट मात्र खासदार संजय पाटील यांच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याने खासदार पाटील यांच्या मताधिक्यावर परिणाम होणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. आमदार विलासराव जगताप यांच्याबरोबर भाजपचे अनेक पदाधिकारी सक्रिय होऊन प्रचार यंत्रणा राबवणार आहेत, तर ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी, सभापती तम्मनगौडा रवी पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव ताड, यांनीही प्रचाराची जोरदार यंत्रणा राबवत आहेत.
तालुक्यात प्रचाराच्या बाबतीत भाजपचे एक पाऊल पुढे असताना दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष शांत सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी आघाडीच्या उमेदवार विशाल पाटील यांना मिळाल्याने राष्ट्रवादी, काँग्रेसच्या गोठात उत्साह संचारला आहे. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी प्रचार जोमनए करणार असे काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांनी म्हटले आहे. काँग्रेस तालुकाध्यक्ष अध्यक्ष आप्पाराया बिरादार, ज्येष्ठ नेते पी. एम. पाटील, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, इराप्पा माळी, संतोष पाटील, दिग्विजय चव्हाण, ॅड. युवराज निकम आदी नेते आता झपाटून कामाला लागतील, अशी शक्यता आहे.

No comments:

Post a Comment