सांगली,(प्रतिनिधी)-
जुन्या
कुपवाड रोडवरील मंगळवार बाजार रस्त्यावर पाठलाग करून सायकल वाराचा खून करण्यात आल्याची
घटना शुक्रवारी रात्री घडली. सुरेश पास्टे (वय 50, रा. स्वामी समर्थ शाळेजवळ,
जुना कुपवाड रोड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव
असून हल्लेखोराचा पोलिसांनी पाठलाग केला. परंतु तो हाताला लागला
नाही. मात्र त्याच्या दुचाकीचा क्रमांक पोलिसांना मिळाला आहे.
जुन्या कुपवाड रोडवरील मंगळवार बाजार परिसरातील आप्पासाहेब काटकर चौकात
शुक्रवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास खून झाल्याचे समजताच त्या परिसरात खळबळ
माजली. वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावून घरी निघालेले हवालदार
नंदू पाटील आणि त्यांच्या सहकार्यांना काही अंतरावरून हल्लेखोर
खाली पडलेल्या व्यक्तीवर वार करत असल्याचे दिसले.
पोलिसांना पाहताच
हल्लेखोराने आपल्या मोटारसायकलवरून धूम ठोकली. दोघाही पोलिसांनी
हल्लेखोराचा सह्याद्रीनगरमधील रेल्वे उड्डाणपुलापर्यंत पाठलाग केला. पण तो सापडला नाही. अंधाराचा गैरफायदा घेऊन तो पसार झाला.
हल्लेखोराच्या गाडीचाक्रमांक मिळाल्यानंतर हवालदार पााटील यांनी या घटनेची
माहिती संजयनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी
धाव घेतली. पोलीस उपाधीक्षक संदीप गिल, संजयनगरचे पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, गुंडाविरोधी पथकाचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह मोठा फौजफाटा त्या परिसरात पोहोचला.
त्याचवेळी वडील अजून कसे घरी आले नाहीत, म्हणून
सुरेश पास्टे यांचा मुलगा त्या ठिकाणी आला होता. त्यानेच वडिलांचा
मृतदेह ओळखला. मुंडके तोडण्याचा प्रयत्न शहरातील राजवाडा चौकात
पानपट्टीचा व्यवसाय करणारे सुरेश पास्टे हे सध्या आचारी म्हणून काम करत होते.
भारती वैद्यकीय महाविद्यालयातील लेडीज वसतिगृहातील मेसमध्ये ते कामाला
जात होते. शुक्रवारी ते काम संपवून सायकलवरून संजयनगरकडे येत
होते. त्यावेळी पाठीमागून पाठलाग करत आलेल्या हल्लेखोराने पास्टे
यांना काटकर चौकात अडवून सपासप वार केले. मानेवर सपासप वार झाल्याने
पास्टे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. ते खाली पडल्यानंतरही हल्लेखोराचा
हल्ला सुरूच होता. हल्लेखोराने खाली बसून पास्टे यांचे मुंडके
तोडण्याचा प्रयत्न चालवला होता. तेवढ्यात त्याला वाहतूक शाखेचे
दोन पोलीस दुचाकीवरून आपल्याकडे येत असल्याचे दिसले. त्यानंतर
त्याने एक चाकू आणि दुसर्या चाकूची मूठ तेथेच टाकून पलायन केले.
हल्लेखोरही रक्ताने माखलेला होता, असे काही प्रत्यक्षदर्शींनी
सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून खुनात वापरलेल्या चाकूचे पाते,
एक मूठ जप्त केली असून हल्लेखोराने दोन चाकू आणले असावेत, अशी चर्चा आहे. हल्ल्याचे नेमके कारण आणि हल्लेखोराबाबत
तात्काळ कोणतीही माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी तपासाला गती
दिली असून हल्लेखोराच्या वर्णनावरून त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केल्याचे पोलीस
निरीक्षक सुर्वे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment