Wednesday, March 6, 2019

विजेच्या ठिणग्याने तलावातील कागद जळाला


जत,(प्रतिनिधी)-
 डफळापूर (ता. जत) येथील सुनील तुकाराम छत्रे या शेतकर्यांच्या शेतात तलावात विजेच्या ठिणग्या पडल्याने अडीच लाख रुपये किमतीचा प्लास्टिक आगीत जळून खाक झाला. त्याशिवाय वीजपंपाला जोडलेल्या पाईप, फळांची झाडे आगीत जळाली. याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील छत्रे यांची मिरवाड तलावालगत जमीन आहे.
तेथे त्यांची शेतीच्या पाण्यासाठी मोठा शेततलाव बांधला होता. त्यात प्लास्टिक कागद घातला होता. येत्या दोन दिवसांत तलावातील पाणी उचलल्याने कागद उघडा पडला होता. दरम्यान, रविवारी विजेच्या तारांच्या ठिणग्या पडल्याने लागलेल्या आगीत तलावातील कागद जळून खाक झाला.

No comments:

Post a Comment