Sunday, March 31, 2019

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर




जत,(प्रतिनिधी)- 
येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढून मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.    
 
पहिल्या टप्प्यात गुरुवार, 11 एप्रिल रोजी वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली- चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ- वाशिम या मतदारसंघांत मतदानाच्या दिवशी सुटी असणार आहे. दुसर्या टप्प्यात गुरुवार, 18 एप्रिल रोजी सोलापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या दहा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तिसर्या टप्प्यात मंगळवार, 23 एप्रिल रोजी माढा, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सुटी असणार आहे. चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात सोमवार, 29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, मावळ, शिरूर आणि शिर्डी या मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सुट्टी असणार आहे.

1 comment: