Thursday, March 28, 2019

डॉ. रवींद्र आरळी यांची राज्य पर्यटन विकास महामंडळावर नियुक्ती


जत,(प्रतिनिधी)-
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व सांगली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष आणि जत येथील प्रसिद्ध स्रीरोगतज्ञ डॉ. रवींद्र आरळी यांची महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळावर शासन नियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे .

     राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती त्यानुसार डॉ. रवींद्र आरळी यांची निवड करण्यात आली आहे .डॉ. आरळी जत तालुका भाजपचे ज्येष्ठ नेते असून मागील पंचवीस वर्षापासून ते पक्षाचे काम करत आहेत .याशिवाय महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ म्हणून त्यांचा परिचय आहे .डॉ. रवींद्र आरळी यानी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळावर शासन नियुक्त सदस्य म्हणून काम करण्याची इच्छा  प्रशासनाकडे व्यक्त केली होती त्यानुसार त्यांची  निवड करण्यात आली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर आरळी यांना पाठविलेल्या पत्रात नमूद  केले आहे .डॉ. आरळी यांच्यासोबत विजय जाधव कोल्हापूर,  किरण पातुरकर अमरावती ,दिलीप गोडांबे मुंबई , राजेश पवार नांदेड , बाबुराव कदम औरंगाबाद, नामदेव भगत नवी मुंबई ,राजेंद्र महाडिक रत्नागिरी ,संदीप लेले , इशा कोपिकर मुंबई , अनंत देशमुख पाचाड ( रायगड )  यांचीही निवड करण्यात आली आहे .
    डॉ. आरळी यांच्या निवडीबद्दल जत तालुका भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगौडा  रवीपाटील , माजी आमदार मधुकर कांबळे ,  जत तालुका भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडड्डी , सोमनिंग बोरामणी ,  संजय तेली , पंचायत समिती सदस्य रमान्ना जीवन्नवार ,सरपंच नागनगौडा पाटील ,  शिवाजीराव ताड , अँड.एम के पुजारी, लिंबाजी माळी ,दशरथ चव्हाण , अँड. आण्णासाहेब रेऊर , अँड. नाना गडदे , शिवसेनेचे दिनकर पतंगे ,अंकुश हुवाळे , तम्मा कुलाळ , बंटी दुधाळ ,शिवाजी पडळोकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment