Friday, March 8, 2019

तरूणाच्या आत्महत्येप्रकरणी 11 सावकारांवर गुन्हा दाखल


सांगली,(प्रतिनिधी)-
 सावकारी कर्ज आणि त्याच्या वसुलीसाठी तगादा लावून सतत मानसिक छळ आणि काठ्यांनी मारहाण करून तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी तब्बल अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आटपाडी तालुक्यातीलघाणंद येथील शिवाजी तुकाराम कदम (वय 31) यांनी दि. 5 मार्च रोजी सांगलीत रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत संबंधित अकरा जणांची नावे लिहून ठेवली होती.
त्यामध्ये उस्मानाबाद पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिसाचाही समावेश आहेत. आटपाडी तालुक्यातील घाणंदचा शिवाजी कदम हा आयटीआय केल्यानंतर पुण्यात एका वाहन कंपनीत नोकरीला लागला. त्याने त्या ठिकाणी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. तेथील सावकारांकडून छळ होऊ लागल्यानंतर तो सांगलीत आला. वडिलांनी टाटा टेंपो घेऊन देऊन त्याला धीर दिला. त्याने प्रेमविवाह करून सांगलीतील गणेशनगरमध्ये संसार थाटला. सासरच्या मंडळींनीही खासगी सावकारकीच्या माध्यमातून शिवाजी याला कर्ज दिले. त्यानंतर मात्र पुणे आणि सांगलीतील सासरच्यांनी वसुलीसाठी शिवाजीला छळायला सुरुवात केली. वेळप्रसंगी काठ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. सततच्या छळाला कंटाळून त्याने रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. पण आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवून त्यामध्ये कोणी कसे आणि का छळले, मारले, याचा सविस्तरपणे उल्लेख करून ठेवला. त्या चिठ्ठीच्या आधारे त्याचे वडील तुकाराम नामदेव कदम (वय 60) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली. फिर्याद देतानाच त्यांनी संशयितांची नावे दिले आहेत. त्याप्रमाणे पोलिसांनी तुकाराम कोहिनकर, पांडुरंग किसन कोहिनकर, दादा दाभोडे (तळेगाव, पुणे), धनाजी गायकवाड (रा. बिजलीनगर,पुणे), पांडुरंग (कवठेमहांकाळ), दिनेश ससाणे (रा. सोलापूर, सध्या उस्मानाबाद पोलीस दलात कार्यरत), राजू हातकणंगलेकर, राणी हातकणंगलेकर, रेचल नायर, रवी नायर, अजय नायर (सर्वजण रा. सांगली) आदींचा समावेश आहे. संशयित नायर कुटुंबातील तरुणीशी शिवाजीने प्रेमविवाह केला होता. शिवाजीने पत्नीच्यासंदर्भात मात्र कोणतीही तक्रार केलेली नाही, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment