Thursday, March 7, 2019

जत पूर्वभागातील वाळू तस्करी रोखण्याचे आव्हान


जत,(प्रतिनिधी)-
 संख येथे नव्याने रुजू झालेले अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी उमदी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. पण या नवीन अधिकार्यांसमोर जुनीच आव्हाने आहेत. ती आव्हाने पेलणार का, हा येणारा काळच ठरवेल. उमदी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांची बदली मुख्यालयात झाली.
तालुक्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी, बोरी नदीपात्रातील वाळू तस्करी यासह गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान नव्या अप्पर तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षकांसमोर असणार आहे. जत तालुक्यातील बोरी नदी पात्रातून वाळू तस्करी करणार्या वाळू तस्करांबरोबर गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचे मोठे आव्हान नूतन अधिकार्यांसमोर आहे. उमदी पोलीस ठाण्याची आजवरच्या अनेक अधिकार्यांना गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले. काही अधिकार्यांचा अवैद्य धंदे, तस्करी यांना अभय दिले. काही मंडळींनी पुराव्यानिशी स्पष्टीकरण अगदी समोरासमोर दिले होते. जत तालुक्यातील अवैध धंदे रोखणे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे, हे आव्हान नूतन अधिकार्यांना पेलणार का, हाच मोठा प्रश्न आहे. आजवर जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याला अधिकार्यांची नियुक्ती म्हणजे शिक्षा म्हणून पाठवलेले अधिकारी अशी होती. मात्र सध्या या भागातील वातावरण बघता इथे आलेले अधिकारी परत जाण्यास तयारच होत नाहीत. तितकी सुजलाम-सुफलाम परिस्थिती अधिकार्यांची असते, उमदी पोलीस ठाणे मिळविण्यासाठी अधिकार्यांम ध्ये स्पर्धा असते. त्यामुळे जत तालुक्याच्या पूर्व भागातील अवैध धंदे, तस्करी व गुन्हेगारी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान येथील नूतन अधिकार्यांसमोर असणार आहे. यापूर्वी अवैद्य धंदे तस्करी गुन्हेगारीवर तितकासा वचक नव्हता तस्कर व गुन्हेगारी यांनी आपला जमच या भागात बसविल्याचे दिसते. त्यामुळे या दुष्काळी चराऊ कुरणांमध्ये पोलीस अधिकारी व महसूल अधिकार्याची एन्ट्री कशी होते यावरच पुढचा खेळ अवलंबून असणार आहे.

No comments:

Post a Comment