Saturday, March 9, 2019

नविन शिक्षक भरतीपूर्वी पदोन्नतीचा विषय मार्गी लावणार


सीईओ राऊत यांचे शिक्षक संघ शिष्टमंडळास आश्वासन
जत,(प्रतिनिधी)-
 नविन शिक्षक भरतीपूर्वी पदोन्नती देण्यात येईल असे आश्वासन सीईओ अभिजित राऊत यांनी दिल्याची माहीती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिदे व सरचिटणीस अविनाश गुरव यांनी दिली. सांगली जिल्हा परिषदेकडील ज्या शिक्षकांची रँडम राऊंडमध्ये बदली झालेली आहे अशा शिक्षकांना समुपदेशनाने सोयीच्या शाळा मिळाव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने केली.
याचबरोबर विस्थापित मध्ये झालेल्या शिक्षकांनाही सोयीच्या नेमणुका, नवीन भरती पूर्वी द्यावी विषय शिक्षकांना पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी तात्काळ द्यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली. त्यावेळी पदोन्नतीबाबत ही चर्चा होऊन नवीन भरती पूर्वी शिक्षकांच्या सर्व पदांवर पदोन्नती करण्याची ग्वाही श्री राऊत यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिली. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळामध्ये विनायक शिंदे, अविनाश गुरव, सलीम मुल्ला, सुधाकर पाटील, श्याम गोंडा पाटील, वसंत शिंगारे, किरण वाघमारे, दीपक कांबळे यांच्यासह शिक्षक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment