Wednesday, March 6, 2019

''स्वच्छ सर्वेक्षणा’त महाराष्ट्र अव्वल"


 सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, तासगाव कचरामुक्त
जत,(प्रतिनिधी)-
 स्वच्छ सर्वेक्षण-2019’ मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे, तर स्वच्छ सर्वेक्षणातबेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा तिसर्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी नवी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
येथील विज्ञान भवनात एका शानदार समारंभातस्वच्छ सर्वेक्षण-2019’ चे निकाल घोषित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोत्तम 10 पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. महाराष्ट्राला सर्वोत्तम (बेस्ट परफॉर्मिंग स्टेट) राज्याचा तिसर्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे, राज्य अभियान संचालक जयंत दांडेगावकर व सुधाकर बोबडे यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला. या कार्यक्रमास केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय शहरी विकास विभागाचे सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा उपस्थित होते. राज्यातील 27 शहरांना कचरा मुक्त शहरांसाठीथ्री स्टारदर्जा स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 27 शहरे कचरा मुक्त ठरली आहेत. यामध्ये मूल, वैजापूर, वसई विरार, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, खोपोली, जुन्नर, लोणावळा, सासवड, भोर, इंदापूर, संगमनेर, परळी, पंढरपूर, मंगळवेढा, महाबळेश्वर, पाचगणी, कराड, रत्नागिरी, मलकापूर, पन्हाळा, वडगाव, कोल्हापूर, गडहिंग्लज, विटा, तासगाव, कोरेगाव या शहरांचा समावेश आहे. कचरा मुक्तीसाठी या शहरांनाथ्री स्टारदर्जा देण्यात आला आहे. या सर्व शहरांना केंद्रीय शहर विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment