Monday, March 4, 2019

डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षा पंधरा दिवसांत घ्या


सांगली,(प्रतिनिधी)-
 जिल्हा परिषदेच्यावतीने डॉ. पतंगराव कदम यांच्या नावाने घेण्यात येणार्या शिष्यवृत्ती परीक्षेला शिक्षण आयुक्तांनी परवानगी देऊन पंधरा दिवसांत परीक्षा घेण्याचा आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिला. जिल्ह्यातील एक लाख किशोरवयीन मुलींची आरोग्य आणि हिमोग्लोबीन (एच. बी.) तपासणीचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आल्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. स्थायी समितीची मासिक सभा अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी सभापती डॉ. सुषमा नायकवडी, अ रु ण राजमाने, तम्मनगौडा रवीप ा ट  ी ल , म ु ख् य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्यावतीने डॉ. पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी परीक्षा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे. यंदा प्रथमच डॉ. कदम शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार असल्याने शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली होती. मागील गुरुवारी शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर होणार असल्याचे विद्यार्थ्यांनाही सांगण्यात आले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयारी केली होती. शिक्षण विभागाकडे परवानगी नसल्याने परीक्षेसाठी परवानगी मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. गुणवत्ता चाचणी परीक्षेची परवानगी घेवून पंधरा दिवसात परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एक लाख किशोरवयीन मुलींची आरोग्य आणि हिमोग्लोबीन तपासणी करण्यात येईल. कमी हिमोग्लोबीन असलेल्या मुलींवर विशेष लक्ष देऊन ते वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. ॅमेनियायुक्त (रक्तक्षयमुक्त) जिल्हा करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून 91 गावांसह 628 वाड्या-वस्त्यांवरील दोन लाख पाच हजार लोकसंख्येला 88 टँकरनी पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरची मागणी वाढत आहे. तात्पुरत्या नळपाणी पुरवठाची कामे तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा परिषदेकडील प्रयोगशाळेचे कामकाज तात्काळ पूर्ण करुन घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आरोग्यवर्धिनी केंद्र ही शासनाची योजना असून त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश करण्याची शिफारस यावेळी करण्यात आली.

No comments:

Post a Comment