Sunday, March 3, 2019

हरहुन्नरी, बहुगुणी अभिनेता - प्रसाद ओक



मल्टिफॅसेटेड पर्सनॅलिटी अर्थात ‘बहुगुणी व्यक्तिमत्त्व’ ही उपाधी तशी अभावानेच कुणाला तरी मिळू शकते. कारण एकच व्यक्ती विविध क्षेत्रांत उत्तमपणे व यशस्वीपणे आपला ठसा उमटवत लोकांच्या हृदयात जागा पटकावत आहे. ही खूपच अवघड अशी गोष्ट आहे. परमेश्‍वराचा डोक्यावर हात घेऊनच अशा व्यक्ती इथे जन्म घेतात. एकाच क्षेत्रात अनेक क्षितिजे पादाक्रांत करणारे खूपजण असतात; पण अनेक क्षेत्रांत तेवढ्याच धडाडीने काम करत नवनवी मानचिन्हे मिळवणारे तसे कमीच असतात. त्यामुळे मूळचा पुण्याचा एका साध्या कुटुंबातला एक हौशी, धडपड्या कलाकार आज मराठी कलाक्षेत्रात विविध प्रकारच्या प्रांतात यशस्वीपणे मुशाफिरी करताना दिसत आहे. उत्तम नट, दिग्दर्शक, टीव्हीवरच्या मालिकेत चमकणारा निवेदक व सूत्रधार, सारेगमपसारख्या दर्जेदार संगीताच्या स्पर्धेतला विजेता
सुरुवातीच्या करियरविषयी मी मूळचा पुण्याचा, बीएमसीसी कॉलेजातून 1995 साली बी. कॉम. पास झालो. कॉलेजात असताना साहजिकच पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक यांसारख्या स्पर्धातून सातत्याने भाग घ्यायचो. घरची अभिनयक्षेत्रातली काहीएक पार्श्‍वभूमी नसतानाही केवळ उपजत आवडीमुळे त्यात रमलो. नोकरी वगैरेसारखा तद्दन विचारही मनात न आणता अभिनयक्षेत्रातच पुढे करियर करण्याचे निश्‍चित होते. त्यानुसार पुण्यातल्या काही स्थानिक संस्थांमधून छोटी-मोठी कामे करायला लागलो. ‘हमीदाबाईची कोठी’, ‘पाहता पाहता जमलं’, ‘भ्रमाचा भोपळा’ यासारखी हलकीफुलकी व सीरियस अशा बर्‍याच प्रकारच्या नाटकात काम करत होतो. त्याचवेळी अतुल पेठेच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. मोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर त्यावेळी प्रथमच काम करत होतो. बराच अनुभव आणि खूप सारं शिकायला मिळाल्यानंतर ह्या क्षेत्रात पूर्णवेळ स्थिरावण्यासाठी तडक मुंबईला येऊन स्थायिक झालो. जवळजवळ चार ते पाच वर्ष स्ट्रगल केला. कारण कुठल्याही नव्या कलाकाराला आयते यश मिळवताच येत नाही. त्यावेळेला टीव्हीवर चॅनेल्सही नव्हते. साधारणपणे दोन हजार सालानंतर झी अल्फा व दूरदर्शन ह्या चॅनेल्सवर मराठी कलाकारांना बर्‍यापैकी संधी मिळू लागली. अभिनयक्षेत्रात स्थिरावल्यानंतरचा काळ ‘आलटून पालटून’ हे नाटक वेगळ्याच विषयावरचं होतं. त्याचे खरे तर उदंड प्रयेाग व्हायला पाहिजे होते. ते होऊ शकले नाहीत. अभिराम भडकमकरसारखा खंदा लेखक, भक्कम निर्मिती संस्था आणि हृदयस्पर्शी आव्हानात्मक भूमिका असं सगळं उत्तम रसायन त्यात होतं. चिन्मय मांडलेकरचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे. त्याचा पहिला सिनेमा ‘क्षण’ मी केला. त्याची पहिली मालिकाही खूप गाजली ती ‘अवघाची संसार’, त्यातही मीच होतो आणि आता हे त्यांनी लिहिलेलं नाटक ‘बेचकी’ त्यात माझीच प्रमुख भूमिका आहे. नुकत्याच रंगमंचावर आलेल्या ‘नांदी’ ह्या नाटकात तर आम्ही दोघंही नट म्हणून एकत्र येत आहोत. मालिकांमधला आघाडीचा अभिनेता जेव्हा अनेक मराठी चॅनेल्स प्रेक्षकांना उपलब्ध झाली तेव्हा आम्हा नटमंडळींनाही प्रचंड संधी उपलब्ध झाल्या. विविध चॅनेल्सवर एकाचवेळी वेगवेगळ्या मालिकांमधून भिन्न प्रकारच्या भूमिका साकारल्या. हे अभिनयदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्याही खूपच फायदेशीर बनलं आहे. आजपर्यंत माझ्या गाजलेल्या मालिकांमध्ये ‘अवघाचि संसार’, ‘वादळवाट’, ‘पिंपळपान’, ‘दामिनी’, ‘चार दिवस सासूचे’ अशा अनेकांचा समावेश आहे. चित्रपटक्षेत्रातली कामगिरी : अभिनय करणार्‍या प्रत्येकाला नाटक मालिकानंतर साहजिकच चित्रपट क्षेत्राचा मोह वाटतो. कारण नाटक करणं हा जिवंत अनुभव आहे. तसाच चित्रपट तुम्हाला इमॉर्टल बनवतो. कितीही वर्षानंतर तुमचे त्यावेळचे प्रयत्न अभिनय, वय, दिसणं हे सगळं कायमस्वरूपी चिरंतन राहतं. त्यामुळे मराठी चित्रपटक्षेत्रात मी मुशाफिरी करणं, हे अपरिहार्यच होतं. ‘क्षण’ (मंदार देवस्थळी) ‘फूल थ्री धमाल’ (दिग्दर्श. महेश कोठारे), ‘एक डाव धोबीपछाड’ (दिग्द. सतीश राजवाडे), ‘ती रात्र’ (दिग्द. विजू माने), ‘दोघात’ (दिग्द. कांचन नायक) ह्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर मी इतरही अनेक चित्रपटांत भूमिका केल्या. ‘हाय काय नाय काय’सारखा चित्रपट मी स्वत: दिग्दर्शित केला. त्यातल्या ‘ती रात्र’ ह्या चित्रपटाल मला स्टेट अ‍ॅवार्ड मिळाले आहे. -प्राअभिय व इतर क्षेत्रातले मैलाचे दगड खरे तर ‘रणांगण’ ह्या नाटकापासून माझी खरी ओळख प्रेक्षकांना झाली. अविनाश नारकरसमोर मुघल सरदार कुतुबुद्दिनची नकारात्मक, हिंसक भूमिका मी जीव तोडून केली आणि त्याला रसिकांची खूपच प्रशंसा मिळाली. ‘सारेगमप’ ह्या संगीतस्पर्धेत बाकी सर्व स्पर्धक तयारीचे व संगीत शिकलेले होते. तरीपण शेवटी अंतिम स्पर्धे त सुमीत राघवनबरोबर माझी स्पर्धा खूपच रंगली. तो स्वत: संगीत शिकलेला आहे; पण जेव्हां दृश्य स्वरूपात संगीत स्पर्धा झाली तेव्हा माझ्यातला अभिनेता परफॉमिर्र्ंग म्युझिकमध्ये काकणभर सरस ठरला आणि मी विजेता ठरलो! एवढ्या मोठ्या केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरातल्या बर्‍याच देशांमध्ये त्याचे प्रक्षेपण झाले व एक हौशी गायक एवढी मोठी संगीतस्पर्धा केवळ जिद्दीने व ‘किलिंग इन्स्टींक्ट’ मुळे जिंकू शकला. भविष्यातले प्रोजेक्ट्स सध्या ‘बेचकी’ हे नाटक जोरात चालू आहे.


No comments:

Post a Comment