जत,(प्रतिनिधी)-
निवडणूक
आयोगाने रविवारी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केली असून या आचारसंहितेचे तंतोतंत
पालन करण्याचे आदेश तुषार ठोंबरे यांनी दिले आहेत. जत विधानसभा
क्षेत्रातील सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात आयोजित बैठकीत
प्रांत ठोंबरे बोलत होते.
तुषार ठोंबरे म्हणाले की,भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
या काळात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने सूचना देण्यात येत आहेत. कुठल्याही
राजकीय पक्षांनी प्रचारासाठी शासकीय सार्वजनिक खाजगी घरे दुकाने धार्मिक स्थळाचा वापर
करायचा नाही. तालुक्यात ज्या-ज्या ठिकाणी
पोस्टर, झेंडे आहेत, त्याचे आदेश स्वराज्य
संस्थांना दिले आहेत. प्रचार काळात ज्या पक्षांना सभा,
रोड शो घ्यायचे आहेत, त्यांना परवानगी घ्यावी लागेल.
वाहने परवानगीशिवाय वापरता येणार नाहीत. आचारसंहिता
लागताच सर्व शासकीय वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. काही तक्रारी
असल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंद करता येईल. जत तालुक्यात
5 भरारी पथके नियुक्त केली आहेत. अनेक ठिकाणी चेक
पोस्ट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यात अनेक ठिकाणी
चेक पोस्ट उभे केले आहेत. हा तालुका कर्नाटक सीमेवर आहे.
तसेच सोलापूर, अथणी, कवठेमहांकाळ,
सांगोला यांना जोडणार्या पोस्ट केले आहेत.
निवडणूक काळात पैसा, शस्त्रे, दारू यांची वाहतूक होऊ नये, असे ठोंबरे यांनी सांगितले.
बैठकीस तहसीलदार सचिन पाटील, अप्पर तहसीलदार पिसाळ,
गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, निवडणूक नायब तहसीलदार
संजय पवार, संजय कांबळे, चंद्रकांत गुङोङगी,
विक्रम ढोणे, बसवराज पाटील आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment