Sunday, March 10, 2019

धनगर समाजाची सरकारने केली फसवणूक : प्रकाश शेंडगे

जत,(प्रतिनिधी)-
धनगर समाजाला आदिवासीचे आरक्षण मिळवण्यासाठी धनगर व धनगड जमात एकच असल्याचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. मात्र, सरकार न्यायालयात राज्यात धनगड आदिवासी जमात अस्तित्वात नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. धनगर आरक्षण प्रश्न न्यायालयात लटकविण्याचा डाव आहे. सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी जत येथे बोलताना केला

श्री. शेंडगे म्हणाले की, सरकारला सत्तेतुन खाली खेचण्याठी आणि धनगर समाजाला सत्तेत बसण्यासाठी राज्यातील ओबीसी भटक्या जाती जमातींना सोबत घेऊन आगामी लोकसभेच्या सर्व 48 व  विधानसभेच्या 288 जागा लढविण्याचा निर्धार करण्यात आला. 
यावेळी शेंडगे म्हणाले, सरकारने आरक्षणाचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. सरकारची धनगर समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे आगामी निवडणूका स्वतंत्र लढवणार असून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी, संविधान बचाव अशा मुंद्यावर निवडणूकीला सामोरे जाणार आहे. राज्यात ओबीसी, भटक्या जाती जमातींची लोकसंख्या 60 टक्के असून यांना सोबत घेऊन स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचेही शेंडगे यावेळी म्हणाले. धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून सरकारने गेली साडे चार वर्षे समाजाला खेळवत ठेवले, असा आरोप शेंडगे यांनी केला.

No comments:

Post a Comment