जत,(प्रतिनिधी)-
देवनाळ
(ता. जत, जि. सांगली) येथील राजाराम बलभीम कांबळे याने उदगाव येथे
आत्महत्या केल्याची नुकतीच घटना घडली. त्याची पत्नी, सासू, सासरे, मेहुणा व अन्य एक
अशा पाचजणांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद राजाराम कांबळे यांचे बंधू
रामचंद्र बलभीम कांबळे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी
संशयित पत्नी गंगा कांबळे, सासू शांताबाई लांडगे, सासरे लक्ष्मण लांडगे, मेहुणा मर्याप्पा लांडगे व योगेश आवळे यांना न्यायालयात हजर केले असताना दोन दिवसांची
पोलिस कोठडी सुनावली.
No comments:
Post a Comment