जत,(प्रतिनिधी)-
श्रीक्षेत्र
आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवानिमित्त प्रतिवर्षी विविध
धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावर्षीही
बुधवार दि. 26 मार्चपासून ते 3 एप्रिल
2019 अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांनी भंडारा उत्सवास प्रारंभ होत आहे.
नित्याचे कार्यक्रम असे ः मंगळवार, दि.
26 मार्च रोजी सायंकाळी 7 वा. वीणापूजन, आरती दररोज पहाटे 4 ते
5 या वेळेत ’श्रीं’च्या समाधीचे
पूजन, 5 ते 6 काकड आरती, दुपारी 4ते 5.30 हरिपाठ,
सायंकाळी 7 वा. आरती,
9 ते 11 यावेळेत किर्तन व रात्री11ते पहाटे 4 हरिजागर होईल. दररोजचे
प्रवचनकार व कीर्तनकार असे ः मंगळवार दि. 26 मार्च रोजी ह.भ. प. रणजित भारमल महाराज
(अवचितवाडी) यांचे सांय. 6.वा. प्रवचन, रात्री 9 वा. ह.भ.प.
बी जी. सुतार महाराज (उंदरवाडी)
यांचे कीर्तन, बुधवार दि. 27 मार्च रोजी ह.भ.प. रामचंद्र पाटील महाराज (आदमापूर) यांचे सायंकाळी प्रवचन, ह.भ.प. नागेश कुलकर्णी (नातेपुते)
यांचे रात्री कीर्तन, गुरुवार दि.28 मार्च रोजी सायंकाळी ह.भ.प.
विनय कुलकर्णी (मुरगुड ) यांचे प्रवचन, रात्री बाळासो पाटील महाराज (पुंगाव ) यांचे कीर्तन, शुक्रवार
दि.29 मार्च रोजी सायंकाळी ह.भ.प. मृत्युंजय स्वामी महाराज (सिध्दारुढ
मठ, शेंद्री यांचे प्रवचन, रात्री ह.भ.प. विष्णू खोराटे महाराज यांचे
कीर्तन, शनिवार दि. 30 मार्च रोजी सायंकाळी
ह.भ.प. शशिकांत कोंडेकर
महाराज (यमगे). यांचे प्रवचन, रात्रौ ह.भ.प. अर्जुन जाधव महाराज (तवंदी शिप्पूर), यांचे कीर्तन, रविवार दि.31 मार्च
रोजी सायंकाळी नानासो दत्तात्रय पाटील (आदमापूर) यांचे प्रवचन, रात्रौ ह.भ.प. नानासो शिवाजी पाटील (आदमापूर)यांचे कीर्तन, सोमवार दि.1 एप्रिल
रोजी रात्रौ ह.भ.प. बाळकृष्ण परीट (हनिमनाळ) यांचे
काल्याचे कीर्तन होणार आहे. व रात्रौ जागर. अशा धार्मिक कार्यक्रमांनी भंडारा उत्सव संपन्न होणार आहे. दररोज रात्रौ 11 ते 4 पर्यंत कडगाव,
तुरंबे, सरवडे, गडहिंग्लज,
औरनाळ, आदमापूर, नरतवडे,
उंदरवाडी, मालवे, हनिमनाळ,
शेंद्री, हरळी, हरगापूर गड,
कासारवाडा, मुदाळ, मडिलगे,
कूर, निढोरी, सोनाळी,
निळपण, भोगावती, बिद्री,
कुरणी, बोरवडे, वाघापूर,
धामोड, पुंगाव, व्हनगुती,
कोनवडे, मांगेवाडी व जिल्हयातील भजनीमंडळे हरिजागर
करणार आहेत. या सर्व भजनी मंडळास ह.भ.प. तात्या पाटील महाराज (नरतवडे),
बाळासाहेब पाटील (पुंगाव), धुळाप्पा पाटील, मिलिंद पाटील (आदमापूर) व भरत परीट (औरनाळ)
या मृदंग वादक यांची साथ मिळणार आहे. मंगळवार,
दि. 2 एप्रिल रोजी पहाटे 4 ते 6 वा. बाबूराव डोणे यांचा मुलगा
कृष्णात डोणे यांची भाकणूक होईल. सकाळी 10 वा. महाप्रसाद व बुधवार दि.3 एप्रिल
रोजी सकाळी 9 वा.श्रींचा पालखीसोहळा आदमापूर
गावातून निघणार असून दु. 4 वा. प्रसाद होऊन
भंडारा उत्सवाची सांगता होणार आहे. तरी भाविक भक्तांनी या धार्मिक
कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सदगुरु बाळुमामा
देवालय समिती व ग्रामस्थ यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment