जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यात 131 गावे
व 864 वाड्या-वस्त्यांवरील 2 लाख 82 हजार 766 शेतकर्यांना 134 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून टँकरची
मागणी कुठेही प्रलंबित नाही. मागणी येईल तशी खात्री करून तात्काळ
टँकर दिला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी दिली.
जिल्ह्यात मागील वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने पाणी
कमी आहे.
त्यामुळे दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये सध्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. उन्हाची तीव्रता वाढतच चालल्याने दिवसेंदिवस
या तालुक्यातील गावात टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. गेल्या
दोन महिन्यांपासून दुष्काळी तालुक्यातील काही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात
येत असून या गावे आणि टँकरेच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. टँकरच्या संख्येत जानेवारीतच दुपट्टीने वाढ झाली होती. वाढ अद्याप सुरूच असून डिसेंबरअखेर जिल्ह्यात असणारी 29 टँकरची संख्या जानेवारीत दुपटीने वाढली. मार्चमध्ये ही
संख्या मोठी वाढ झाली आहे. 131 आणि 864 वाड्या-वस्त्यांवर 134 टँकरव्दारे
पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक जत तालुक्यात
70 गावे आणि 537 वस्त्या, आटपाडी तालुक्यात 29 गावे आणि 206 वस्त्या, कवठमहांकाळमध्ये 15 गावे
76 वस्त्या, खानापूरमध्ये 10 गावे, तासगावात 8 गावे,
8 वस्त्या, मिरजेत 2 गावे
व 2 वस्त्यांचा समावेश आहे. पिण्याच्या
पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. जानेवारीच्या
तुलनेत फेब्रुवारी आणि मार्चमध्ये उन्हाचा तडाखा वाढत असल्याने दिवसेंदिवस टँकरची मागणी
वाढत आहे.
टँकरने पाणीपुरवठा होत असणारी गावे, वाड्या-वस्त्यांची संख्या व टँकरवर अवलंबून असणारी तालुकानिहाय
लोकसंख्या पुढीलप्रमाणे- जत तालुक्यात 79 टँकरद्वारा 70 गावे अणि 537 वाड्यावस्त्यांना
पाणीपुरवठा होत आहे. जवळपास 1 लाख
83 हजार 450, क.महांकाळ तालुक्यात
9 टँकरद्वारा 15 गावे 76 वाड्यावस्त्यांमधील 21 हजार 495 लोकांना पाणीपुरवठा होत आहे. तासगावमध्ये 5 टँकरने 8 गावे 44 वाड्यावस्त्यांमधील 12 हजार 920 लोकसंख्येला तर मिरज तालुक्यात एका टँकरद्वारा दोन
गावांमधील 3 हजार 367 लोकसंख्येला पाणी
पुरवठा होत आहे. खानापूर
11 टँकर 10 गावे 1 वस्ती
17 हजार 324 लोकसंख्या, आटपाडी
29टँकर 26 गावे 206 वाड्यावस्त्या 44 हजार 210 लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे.
No comments:
Post a Comment