Friday, March 1, 2019

जत तालुक्यातील 32 हजार 422 शेतकर्‍यांना प्रधानमंत्री सन्मान निधी मिळणार


पात्र शेतकर्यांची माहिती अपलोड करण्याच्या कामास गती
जत,(प्रतिनिधी)-
 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात दि. 28 फेब्रुवारीअखेर अनिवार्य माहिती परिपूर्ण असलेल्या पात्र शेतकर्यांची संख्या 2 लाख 42 हजार 296 इतकी झाली आहे. एनआयसी पोर्टलवर ही माहिती अपलोड करण्याची कार्यवाही गतीने सुरू असून, आतापर्यंत 2 लाख 33 हजार 661 पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती अपलोड केलेली आहे. पात्र शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम रुपये 2 हजार जमा होत असून ही रक्कम सर्व पात्र लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली युध्दपातळीवर काम सुरू आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात गतिमान वाटचाल सुरू आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचे सर्व ठिकाणचे लागवडीलायक एकूण धारण क्षेत्र 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी असेल त्यांना लागू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रतिअल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष 6 हजार रुपयेइतके आर्थिक सहाय्य 3 टप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामधील पहिला हप्ता 2 हजार रुपयेप्रमाणे देण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात 8 अ प्रमाणे एकूण खातेदार शेतकर्यांची संख्या 7 लाख 11 हजार 700 इतकी आहे. दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजीच्या प्राप्त आकडेवारीनुसार अनिवार्य माहिती परिपूर्ण असलेल्या पात्र शेतकरी कुटुंबाची तालुकानिहाय संख्या याप्रमाणे ः मिरज 25904, तासगाव 30405, कवठेमहांकाळ 15239, वाळवा 40081, शिराळा 26384, खानापूर 15669, आटपाडी 17600, कडेगाव 22332, पलूस 16260 व जत तालुक्यात 32422. त्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्यातील पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

No comments:

Post a Comment