Sunday, March 24, 2019

टीव्ही मालिकांत न गुरफटता आपल्या मुलांच्या विकासाकडे लक्ष देण्याची आजची गरज


प्राचार्य बोराडे
जत,(प्रतिनिधी)-
आज काल टी व्ही मालिकांचे पेव फुटले असून पालकवर्ग त्यात गुरफटून गेला असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यामुळे घरातील मुलांच्या संस्कारक्षम आणि विकासात्मक वयात त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब गंभीर आहे. कौटुंबिक मालिका या केवळ मालिकाच असतात. काही खरे नसते त्यात. त्यापेक्षा छ. संभाजी महाराज सारखी एखादी मोजकीच मालिका सहकुटुंब पहा आणि आपल्या पाल्याला स्वाभिमानी बनवा. असे विचार जत येथील रामराव विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य वसंत बोराडे यांनी व्यक्त केले.

शेगांव (ता. जत) येथील जनसेवा ग्रामविकास मंडळ व  जनसेवा वाचनालय यांचा २९ वा वर्धापन दिन, बाल संस्कार वर्ग स्टेप वन सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पंचक्रोशीतील मान्यवरांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मुलांच्या कानावर जे शब्द पडतात तेच त्यांच्या तोंडातून बाहेर पडतात. याचा विचार करून पालकांनी आपले वर्तन ठेवले पाहिजे.
 अजिंक्यतारा प्रतिष्ठान, जतचे अध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी जत तालुक्यातील युवक आता स्पर्धा परीक्षांमध्ये उतरुन यश मिळवत आहेत ही समाधानाची बाब आहे. त्यात वाढ झाली पाहिजे, त्यासाठी या संस्थेने मार्गदर्शन केंद्र उभारावे. आम्ही मदतीचा हात नक्कीच देऊ. असे सांगितले. कवी महादेव बुरुटे म्हणाले, माणसाच्या जडणघडणीत वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व असून ते काम वाचनालये करीत आहेत.
या प्रसंगी प्राचार्य बोराडे, डॉ. श्रीकांत कोकरे, वर्षा साळुंखे, मनिषा पाटील, मनोज स्वामी, वेदांत पाटील, अभिलाषा शिंदे, जयश्री चौगुले, सचिन बोराडे, प्रा. विजय गंगाधरे, माजी सरपंच लक्ष्मण बोराडे, कांचनताई बोराडे, महादेव बुरुटे, सरपंच श्री. नाईक इत्यादींचे उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीयोग कोकरे, प्रास्ताविक प्रा. विजय गंगाधरे आणि आभारप्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष अॅड. अशोकराव शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला शेगांव पंचक्रोशीतील मान्यवर व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या बालचमूंच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन ग्रंथपाल धनाजी पाटील व शिक्षिका सौ.मनिषा पाटील आणि सर्व सदस्यांनी केले.

No comments:

Post a Comment