जत,(प्रतिनिधी)-
कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे शाळेतून घरी जात असताना चारचाकी वाहनाने
धडक दिल्याने शाळकरी मुलगा विनोद आकाराम दुधाळ (वय
11, मूळ गाव देवनाळ, ता. जत, सध्या रा. कोकळे, ता. कवठेमहांकाळ) हा ठार झाला आहे.
हा अपघात काल शनिवारी सकाळी साडे अकरा च्या सुमारास झाला.
या अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की विनोद दुधाळ पाचवी मध्ये शिकत होता,
तो सध्या कोकळे येथे मामा जवळ शिक्षणासाठी राहत होता. त्याची शनिवारी सकाळची शाळा असल्याने शाळा साडे अकरा वाजता सुटली होती,
शाळा सुटल्याने विनोद सायकलवरून मामाच्या घरी जात असताना जत कडून कवठेमहांकाळला
जाणारी महेंद्र फिकप् या दूध वाहतूक करत असणार्या चार चाकी गाडीने
धडक दिल्याने विनोद हा गंभीर जखमी झाला होता. त्याला मिरज येथील
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी शनिवारी सकाळी दाखल करण्यात आले होते. परंतु धडक जोरदार असल्याने विनोदाचा उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार
विजय घोलप करीत आहेत.
No comments:
Post a Comment