आमचे सर्वांचें जिवलग , शांत स्वभावाचे , कायम हसतमुख असणारे व जत नगरीतील आदर्श कुटुंबातील आणि जत येथील राजे रामराव महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले चंद्रसेन उर्फ भारत यशवंतराव माने पाटील यांना अखंड सेवा केले नंतर आज त्यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, हे वाचून आम्हा सर्वांना खूप खूप मनापासून आनंद झाला व होत आहे.
चंद्रसेन उर्फ भारत माने पाटील यांच्याशी माझे गेली पस्तीस ते चाळीस वर्षे अत्यंत जवळचे ,मैत्री पूर्ण व जीवाभावाचे संबंध आहेत.
आमच्या मित्रांमध्ये चंद्रसेन मानेपाटील भारत याच नावाने परिचित आहेत. भारत जरी शाळा, कॉलेजमध्ये आमच्याबरोबर वर्गात नसले तरी भारत, शिवाजीराव पवार , श्रीमंत बाळासाहेब कांबळे , सदाशिवराव (सदा) जाधव ,कै महादेवराव जाधव (वाळेखिंडी) ,कै बसवराज पाछापुरे असे सर्वजण जिवलग मित्र होतो. रोज न चुकता सकाळी सायंकाळी शिवाजीराव पवार यांचे जत येथील लक्ष्मी सायकल सर्व्हिस येथे एकत्र येऊन गप्पा मारत असू. या गप्पा किमान चार पाच तास चालत असत या वेळी बऱ्याच वेळा गुंडूराव नदाफ व कै पंचाक्षरी म्हणजेच आम्हा सर्वांचे मामा व शिवाजीराव पवार यांचे वडिलांचे परम मित्र पंचू मामा असायचे त्या मुळे आमचे गप्पात वेगळीच रंगत येत असे. अशा या आमच्या ग्रुपमध्ये जबाबदार व प्रमुख व्यक्ती म्हणजे भारत! तो काळच अत्यन्त सुंदर होता व त्याची आठवण आजही डोळ्यासमोर येते.
आपल्या भारत सरांचे संपूर्ण जीवन आणि बालपण जतलाच गेले. जत नगरीतील प्रसिद्ध पोलीस पाटील घराणं आजही त्याच नावाने प्रसिद्ध आहे.जतचेआदर्श पोलीस पाटील म्हणून भारत यांचे वडिलांचे नाव सर्वांचे मुखात आहे. अचानक काळाने कठीण प्रसंगास सामोरे जावे लागलेने सरांचे वडिलांना देव आज्ञा झालेने व सर्व मुले लहान ,घरात वडिलोपार्जित शेती आशा या मोठया कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या आईंवर येऊन पडली.मातोश्रीनी, आई व वडिलांची या दोन्ही भूमिका स्वतः लहान लहान मुलांना बरोबर घेऊन झोपडी वजा छोटे घरात राहून शेती करून मोठया हिमतीने पुढील संसाराचा गाडा ओढत सर्व मुलांना मोठे करून त्यांचे शिक्षण पूर्ण केले ते दिवस आजही डोळ्यासमोर येतात , या त्यांच्या अडचणीच्या काळात या कुटुंबास खरा व मोलाचा आधार आपले जतचे, गरिबांचे आधार स्तंभ , शिक्षण प्रेमी , माननिय श्रीयुत श्रीमंत विजयसिंह राजे साहेब डफळे सरकार यांनी फार मोलाचा आधार दिला होता तसेच आमचे कुटुंबास ही आमचे वडीलांना देव आज्ञा झाले वर असाच मोठा आधार दिला होता ,बऱयाच वेळा सरांचे मळ्यात,चटणी भाकरीचा आनंद घेतला आहे सरांच्या आई ह्या कै रा बा पाटील सरांच्या भगिनी ,सरांना दोन बंधू मदन व मोहन , श्री मदन यांनीही आपल्या घराण्याकडे असणारी पोलीस पाटील की अत्यंत सुंदर व जबाबदार पणे पार पाडत आहेत यात शंकाच नाही ,श्री मोहन यांनीही आपले क्षेत्र अत्यंत सुंदर पणे सांभाळले आहे , दोघेही बंधू सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असतात सरांचे चिरंजीव व कन्या यांनी ही उच्च शिक्षण पूर्ण केले आहे व सौ वहिनींनी संसार सुंदर पणे सांभाळला आहे आज श्री भारत माने पाटील सराना सेवा गौरव पुरस्काराने भूषविणेत येत आहे म्हणजे जत गावाला भूषणावह आहे यात शंकाच नाही त्या निमित्ताने मी भारत सरांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा देतो व धन्यवाद देतो तसेच सेवा गौरव समितीला ही मनापासून धन्यवाद देतो
-- बाळासाहेब अशोक तिल्याळकर /इनामदार सांगली /जत
No comments:
Post a Comment