Thursday, March 7, 2019

निवडणुका खुल्या वातावरणात पार पडण्यासाठी पोलीस दल सज्ज


सांगली,(प्रतिनिधी)-
 लोकसभा निवडणूक खुल्या आणि म तदारांसह जनतेच्या दृष्टीने भयमुक्त वातावरणात पार पडली पाहिजे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांसह जिल्हा पोलीस दल सज्ज आहे. या अगोदरच्या इतर निवडणुकांच्यावेळी ज्यांनी गुन्हे केले आहेत, त्यांच्यावर पुन्हा कारवाईची टांगती तलवार असणार आहे. सराईत गुन्हेगारांच्या तीन टोळ्यांना तडीपार केलंय, पाच टोळ्यांनामोकालावलाय आणि आणखी 16 टोळ्या तडीपारीच्या रडारवर असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूम ीवर पोलीस महासंचालकांनी पुण्यात विशेष बैठक घेऊन प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी कोल्हापुरात सांगली जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला असल्याचे सांगून शर्मा म्हणाले, केवळ निवडणुकीच्या कालावधीतच नाहीतर इतरवेळीही सामाजिक शांतता, जनतेच्या सुरक्षेला पोलीस दलांकडून प्राधान्य दिले जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीची तयारी आम्ही सांगली महापालिकेच्या निवडणुकीपासूनच सुरू केली आहे. 2014 च्या निवडणुकीत चिंचणीमध्ये निवडणुकीच्या काळात गुन्हा केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सातही जणांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे निवडणुकीतला गुन्हा असला तरी पुन्हा त्याची फारशी दखल घेतली जात नाही, असे म्हणण्याचे कारण नाही. गुन्हा हा गुन्हाच असणार आहे. याचा प्रत्यय कोर्टाच्या निर्णयाने आणून दिला आहे. त्या संबंधित सात जणांना पुन्हा कायदेशीर कारवाईला सामोर जावे लागेल. शंभरपेक्षा अधिक जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव प्रांताधिकार्यांकडे, तर स्थानबध्दतेचे दोन प्रस्ताव जिल्हाधिकारी पातळीवर आहेत. ’मोकाच्या 11 पैकी पाच प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर तब्बल 27 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्हाभरात सुमारे 2 हजार 400 मतदान केंदे असतील. त्या सर्व मतदान केंद्राच्या परिसरात योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन झालेले आहे. हॉटेल्स, ढाबे यासह इतर सर्व आस्थापना वेळेतच बंद होतील, याची खबरदारी घेण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागालाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे सर्वसामान्य मतदारांच्या दृष्टीने एक उत्सव असला पाहिजे. त्यामध्ये अडथळा येणार नाही, याची काळजी घेताना जिल्हाचा डेटा एकत्र केला आहे. ॅक्शन प्लॅन तयार ठेवला आहे. दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणारे 528, तीनपेक्षा अधिक गुन्हे असलेले 229, पाचपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले 141 जण आणि इतर छोटे-मोठे गुन्हे करणारे अनेकजण प्रतिबंधात्मक कारवाईच्यारडारवर आहेत. यापैकी काहींना नोटिसा बजावल्या आहेत. वर्षभरात 81 पिस्तूल आणि 16 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. पिस्तुलांची तस्करी करणारा कोणत्याही राज्यातून आला तरी त्याची खैर नाही. गोपनीय माहिती काढण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यान्वित केली आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, राज्यस्तरावरुन वेळोवेळी येणार्या सूचना याबाबत समन्वय राहावा म्हणून निवासी पोलीस उपाधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोली सदलासाठी निवडणुक कक्ष तयार करण्यात आला आहे. आंतरराज्य सीमावर चेक नाके अधिक सतर्क करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment