Tuesday, March 19, 2019

उन्हाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी!

यंदाचा उन्हाळा मोठा भयंकर आहेअजून उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असताना सूर्य अक्षरशआग ओकत आहेवेधशाळेदेखील यंदाचा उन्हाळा तीव्र असण्याची शक्यता व्यक्त केली होतीच,त्यानुसार सध्या त्याचा प्रत्यय येत आहेयंदा सगळीकडे पावसाने समाधान दिले असल्याने विदर्भ,मराठवाडा सोडला राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहेमात्र वातावरणातला बदल उष्णतेची लाट घेऊन येत आहेत्यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य असणार आहेसाहजिकच आपल्याला आपल्या शरीराची आणि अवयवांची काळजी करायलाच हवीउन्हाचा पारा चढत चालल्याने त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता अधिक आहेउन्हाळ्यात डोळ्यांच्या तक्रारी सुरू होतातत्या दूर ठेवण्यासाठी नागरिकांना उन्हात फिरताना डोळ्यांची काळजी घ्यायला हवी आहे.

आपल्या डोळ्यांना आपल्या शरीराचा सुरक्षा कॅमेरा म्हणतातया अवयवाची योग्य काळजी न घेतल्यास माणूस परावलंबी होऊ शकतोबाहेर फिरण्याशिवाय पर्याय नसलेल्यांनी डोळ्यांची निगा राखायला हवी आहेडोळ्यांच्या संसर्गावर वेळीच उपचार घ्यायला हवा आहेउन्हामुळे अनेक तक्रारी वाढतातसाधारणपणे उष्ण वार्यामुळे डोळ्यांची अॅलर्जीजंतुसंसर्ग होण्याची शक्यता असतेधूळ,उष्णता,सुकलेले गवतकण यांच्यामुळे तक्रारी  वाढतातॅलर्जीमुळे डोळे खाजवणेलाल होणेलालसरपणा दिसणेपाणी जाणेकचरा गेल्यासारखे वाटणेजळजळ होणे अशा तक्रारी येतातसूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे मोतीबिंदूकाचबिंदूपडदा कमजोर होणे आणि डोळे कोरडे पडणे अशा तक्रारी या उन्हाळ्याच्या दिवसात उदभवतात.
उन्हात फिरताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहेत्यासाठी महत्त्वाचे म्हणजे शक्यतो ब्रँडेड कंपनीचा गॉगल वापरायला हवाचेहरा,डोके झाकले जाईल अशा पद्धतीने रुमालदुपट्टा बांधावा.तहान लागल्यास शक्यतो लिंबू पाणी पिल्यास फायदा होईलदिवसातून किमान दोन ते तीन वेळा चेहराडोळे गार पाण्याने स्वच्छ धुवण्याची गरज आहेआहारात जीवनसत्त्व अ असलेले पदार्थ ठेवल्यास उत्तमएक्य असल्यास घरी रिकाम्या वेळी डोळ्यांवर काकडीच्या चकत्या ठेवाव्यात.डोळे गार होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात काही गोष्टी टाळणेही महत्त्वाचे आहेयात शक्यतो भर उन्हात बाहेर जाणे टाळायला हवेएसीतून उठून एकदम कडक उन्हात फिरू नकाटीव्हीकॉम्प्युटरसमोर सलग दोन तासाम्पेक्षा अधिक बसणे टाळायला हवेडोळ्यांत जळजळलालसरपणा आल्यास घरच्याघरी उपचार करण्याचा मोह टाळायला हवारिस्क घेऊ नकातसे काही वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यायला विसरू नका.

No comments:

Post a Comment