Saturday, March 2, 2019

माहुलीचा ‘टिटवी’ कान्स महोत्सवात झळकणार


विटा,(प्रतिनिधी)-
 इंग्रजीच्या अंधानुकरणामुळे आणि इंग्रजी शाळांच्या वाढत्या संख्येमुळे मराठी शाळा बंद पडत आहेत, अशी भीषण आणि वास्तव परिस्थिती आहे. मराठी शाळा आणि मराठी भाषा टिकली पाहिजे, यासाठी कायमस्वरूपी दुष्काळी खानापूर तालुक्यातील माहुली गावचे सुपुत्र आणि प्रसिध्द दिग्दर्शक कोेंडय्या माने सरसावले आहेत. त्यांनी टिटवी चित्रपटाची निर्मिती केली असून तो कान्स येथे होणार्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पाठविण्यात आला आहे.
कान्सच्या फिल्म फेस्टिव्हलसाठी जाणारा दुष्काळी भागातील पहिलाच चित्रपट ठरला आहे. ग्रामीण भारतातील तीन मुलांच्या शैक्षणिक प्रवासाचा एक उज्ज्वल आशेविषयीचा चित्रपट आहे. ही मुलं त्यांना आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून धडपडत आहेत आणि त्यांचे पालक अडचणींना तोंड देत आपल्या मुलांना ते शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करत आहेत. हा चित्रपट महाराष्ट्रातील एका खेडेगावाची पार्श्वभूमी असलेल्या व आपल्या परिसरातील काही खर्या घटनांपासून प्रेरित होऊन माहुली गावचे सुपुत्र कोेंडय्या माने यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन कोंडय्या माने यांनी केले आहे. एक्झीकेटिव्ह प्रोड्यूसर योगेश महाडीक तर संतोष माने हे निर्माते आहेत. सोमनाथ वैष्णव, रोशनी भगत, आर्यन रावताळे, प्रतिक्षा जाधव, बालाजी रावताळे या स्थानिक कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशाल साठे, सागर वयते, मयुरी आव्हाड, प्राजयता घाग, अवधूत फलटणकर, विशाल कुलकर्णी यांनी सहकलाकार म्हणून काम केले आहे.

No comments:

Post a Comment