Saturday, March 9, 2019

बेपत्ता बालिकेचा विहिरीत मृतदेह


जत,(प्रतिनिधी)-
 वज्रवाड (ता. जत) येथील अक्षरा सिदधया मठपती ही नऊ वर्षांची चौथीत शिकणारी शाळकरी मुलगी गुरुवारी सकाळी अचानक गायब झाली होती. तिच्या घरच्यांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र तिचा मृतदेह शनिवारी सकाळी एका विहीरीत सापडल्याने परीसरात एकच खळबळ माजली. घटनास्थळी जत पोलिसांनी धावले. त्यांनी दुपारपर्यंत अक्षराचा मृतदेह विहिरीतून काढून उत्तरीय तपासण्यासाठी मिरज येथील सिविल हॉस्पिटल ला पाठवला आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, वज्रवाङ मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीच्या वर्गात शिकत असलेली अक्षरा ही अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या घरच्यांनी जत पोलिसात तक्रार दाखल केली होती. कडक उन्हामुळमागील आठवडाभरापासून शाळा सकाळी सुरु झाली आहे. वज्रवाड जिल्हा परिषद मराठी शाळा चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या अक्षरा सिद्धया मठपती ही नऊ वर्षाची मुलगी गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना त्याचे आपण झाले. तिचे वङील दूध डेअरी चालवताना शेतीही करतात. अक्षरा हिला दोन बहिणी व एक भाऊ आहे. गुरुवारी शाळा सुटल्यानंतर ती घरी जात असताना वाटेत तिला आई व भाऊ भेटले. आईने अक्षराला, मी व तुझा भाऊ जतला जाऊन येतो. तू घरी जा, तुला खायला आणतो, असे सांगितले होते. शाळा सुटून बराच वेळ झाला तरी अक्षरा घरी न आल्याने घरच्यांनी तसेच नातेवाईकांनी गावात वाडी-वस्तीवर तिचा शोध घेतला. ती आईबरोबर जतला गेली असेल म्हणून आईकडे चौकशी केली. पण ती कुठेच सापडली नाही. अखेर घरच्यांनी जत पोलीस धाव घेऊन अक्षरा हिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान शनिवारी सकाळी एका विहीरीत तिचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली. जत पोलिसांना ही घटना समजताच पोलिस उपनिरीक्षक रणजीत गुंडरे व त्यांच्या पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन अक्षराचा विहिरीतील मृतदेह काढून तो उत्तरीय तपासणीसाठी मिरजेतील सिव्हील हॉस्पिटलकडे पाठवला आहे. मृत्यूचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. भीतीचे वातावरण जत तालुक्यात प्रथमच शाळकरी मुलीच्या अपहरणाची घटना घडली आहे. दोन दिवसात दोन मुले गायब झाली होती. त्यामुळे पालकांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून शाळा सुटल्यानंतर तसेच लहान मुले रस्त्याकडेला खेळत असताना घडलेल्या घटनेमुळे पालक चिंताग्रस्त झाले आहेत. बेपत्ता झालेल्या वज्रवाङच्या अक्षराचा मृतदेह विहिरीत आढळल्यानेतर पालकांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. पोलीसाची शोध मोहीम सुरू दोन दिवसात जत तालुक्यात दोन लहान मुले गायब झाल्याने पोलिस चक्रावले आहेत. मुले गायब कशी झाली, गावात, परिसरात कोणी अनोळखी आले होते का? याचा शोध पोलीस घेत आहेत. नूतन पोलीस उपअधीक्षक दिलीप जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक जत तालुक्यात सर्वत्र फिरत असून माहिती गोळा करताना दिसत आहे. वज्रवाडची मुलगी विहीरीत सापडली, तर वायफळ (ता. जत) येथील शिवराज दिगंबर यादव हा अडीच वर्षाचा मुलगा रस्त्याच्या कडेला खेळत असताना त्याचे अपहरण झाले आहे.

No comments:

Post a Comment