Wednesday, March 27, 2019

ऐन निवडणुकीच्या तोंडावर वीजदरवाढ


जत,(प्रतिनिधी)-
 सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असतानाच उन्हाळ्याच्या 38-40 अंश सेल्सिअस तापमानाचे ऊन डोक्यावर घेणार्या सहनशील जनतेला वीजदरवाढीचा दणका बसणार आहे. 101 ते 300 युनिटपर्यंत वीज वापरणार्यांना प्रतियुनिट 24 पैसे जादा मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. उन्हाळ्यात आणि निवडणुकीच्या तोंडावर जनतेला वीजदरवाढीचाशॉकबसणार आहे.

प्रतियुनिटला 16 पैसे वीजदरवाढ होणार आहे. 1 एप्रिलपासूनमहावितरणकडून विजेच्या दरात सहा टक्क्यांनी वाढ होणार आहे. सप्टेंबरमध्ये राज्य वीज नियामक आयोगानं याबद्दलचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येईल. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्वसाम ान्य जनतेला वीज दरवाढीची झळ सोसावी लागेल. राज्यात उन्हाचा कडाका वाढतो आहे. त्यातच आतामहावितरणकडून दरवाढ केली जाणार आहे. चार दिवसांनीमहावितरणची दरवाढ लागू होईल. त्यामुळे विजबिलात सहा टक्क्यांनी वाढ होईल. राज्य वीज आयोगानं गेल्या वर्षी 12 सप्टेंबरला राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीजदरांना मान्यता दिली होती. त्यानुसार महावितरण, अदानी, टाटा पॉवर यांचे वीजदर वाढले. ‘महावितरणला 8268 कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे 1 एप्रिल 2019 पासून नव्या आर्थिक वर्षांतही पुन्हा या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे. दरमहा 100 युनिटपर्यंत वीज वापरणार्या घरगुती ग्राहकांकडूनमहावितरण’ 5.30 रुपये प्रति युनिट इतका दर आकारतं. आता त्यामध्ये 16 पैशांची भर पडेल. त्यामुळे एका युनिटसाठी 5.46 रुपये मोजावे लागतील. तर 101 ते 300 युनिटपर्यंत वीज वापर करणार्या ग्राहकांना प्रति युनिटमागे 24 पैसे जास्त मोजावे लागतील. 500 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांची वीज 15 पैशांनी महाग होणार आहे. वीजदरांसोबतच स्थिर आकारातही 10 रुपयांची वाढ होणार आहे. ‘महावितरणची 12 हजार 382 कोटी रुपयांची दरवाढ तूर्तास लांबणीवर टाकण्यात आली आह.
स्थिर आकारातही दहा रुपयांनी दरवाढ वीज बिलात आधीच दरवाढ सहन करावी लागते आहे.स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन, वीज शुल्क अशा अनेक शुल्काच्या ओझ्याखाली जनता बदलेली असताना स्थिर आकारातही दहा रुपयांची वाढ केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment