Friday, February 1, 2019

अवैधरित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

जत,(प्रतिनिधी)-
उमदी येथील बसस्थानक परिसरात संशयितरीत्या  फिरणाऱ्या दोघांना विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राकेश मधुकर कदम (वय 32) रा.लांडगेवाडी (ता.कवठेमंकाळ) व रोहित अंकुश मंडले (वय 20) राहणार खरशिंग (ता. कवठेमंकाळ) अशी त्यांची नावे आहेत. उमदी पोलिसांनी तीन पिस्तुलासह जिवंत काडतुसे असा एकूण दिड लाख(150000)  रुपये किमतीची तीन पिस्तुले पोलिसांनी जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे.

          उमदी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विनापरवाना अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याची माहिती खबर्‍यामार्फत उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सायंकाळी साडेसात वाजता पायी पेट्रोलिंग करते वेळेस ही कारवाई केली. त्यामध्ये तीन पिस्तुले व तीन जिवंत काडतुसे असा एकूण 150000 किमतीचे पिस्तुले जप्त करून दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.त्यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईमध्ये गावठी बनावटीचे 3पिस्तूल ,त्याचे मुठठे दोन्ही बाजूस प्लास्टिकचे काळे रंगाची पट्टी असलेलेआहेत. स्टेनलेस स्टीलचे कव्हर असलेले तीन जिवंत काडतुसे तसेच या पिस्तोल वरती मेड इन यू. एस. ए. अशी अक्षरे लिहिलेली आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे, उपनिरीक्षक नामदेव दाडंगे, उपनिरीक्षक प्रवीण संपागे, पोलिस हवालदार बामणे, पोलिस हवालदार शिवाजी दिघे, पोलिस नाईक सचिन आटपाडकर, पोलिस नाईक अर्जुन सगर, नितीन पलुस्कर यांनी संयुक्तपणे केली. अधिक तपास सचिन आटपाडकर करत आहेत.

1 comment: