Thursday, February 28, 2019

जनावरांना चार्‍याची व्यवस्था करा सोमनिंग बोरामणी यांची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्याचा पूर्वभाग हा सध्या दुष्काळाच्या टंचाईने हैराण झाला असून जनावरांना खाण्यासाठी चारा उरला नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पशुपालक शेतकर्यांसाठी चारा छावणी किंवा थेट अनुदान देऊन दुष्काळामध्ये मदत करावी, अशा मागणीचे निवेदन सोसायटीचे चेअरमन सोमनिंग बोरामणी यांनी तहसीलदार यांना दिले.
यावेळी एस बी हंजगी, कल्लू बालगाव, जे. एम. जमशेट्टी आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून जत तालुक्याच्या पूर्वभागात पावसाचा पत्ता नाही. खरीप हंगाम वाया गेला असून चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणी, दुभती जनावरे कवडीमोल दराने विकण्याची शेतकर्यांवर वेळ आली असून तालुक्यात दुष्काळ जाहीर करून झाले असले तरी पूर्वभागातील नागरिकांना कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. येत्या आठ दिवसांत जत पूर्वभागात चाराछावणी सुरू करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment