आरक्षण पोहोचले १0३ टक्क्यांवर
जत,(प्रतिनिधी)-
मराठा समाजाला मिळालेले १६ टक्के, तर आर्थिक निकषावर सवर्ण समाजाला मिळालेल्या १0 टक्के आरक्षणामुळे यंदाच्या सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशात गोंधळ उडण्याची चिन्हे आहेत. अकरावीतील इनहाउस महाविद्यालयांतील आरक्षण १0३ टक्क्यांवर पोहोचणार आहे. त्यामुळे प्रवेश कसा द्यायचा, असा प्रश्न कॉलेज प्रशासनाला येत्या शैक्षणिक सत्रात पडणार आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान अल्पसंख्याक महाविद्यालयांना अल्पसंख्याक कोटा ५0 टक्के, व्यवस्थापन कोटा ५ टक्के आणि इनहाउस कोटा २0 टक्के देण्यात आला आहे. तर संविधानिक आरक्षण या महाविद्यालयात देण्यात येत नाही. त्यामुळे काही प्रमाणात अल्पसंख्याक महाविद्यालयांत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळत आहे. परंतु, बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयांची अवस्था प्रचंड वाईट झाली आहे. बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयात इनहाउस कोटा २0 टक्के, व्यवस्थापन कोटा ५ टक्के आणि पूर्वीचे ५२ टक्के आणि आताचे (मराठा एसईबीसी १६ आणि सवर्ण १0) असे २६ टक्के असे एकूण १0३ टक्के आरक्षण होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक आरक्षण झाल्याने ते कसे द्यायचे? यावर सध्या उच्च व तंत्रशिक्षण आणि शिक्षण विभागातील अधिकार्यांचा खल सुरू आहे. मराठा आणि सवर्ण आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकल्यास यंदा महाविद्यालयातील प्रवेशाची वाट अधिकच बिकट होईल. त्यामुळे ऑनलाईन प्रवेशात बदलांसाठी वेळ द्यावा लागणार आहे.
अल्पसंसख्याक महाविद्यालयांत मागासवर्गीयांचे आरक्षण न्यायालयाच्या निर्णयानुसार रद्द झाल्याने अल्पसंख्याक महाविद्यालयातील प्रवेशाचे दरवाजे आरक्षित घटकांना बंद झाले आहेत. यातच राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या आरक्षणांमुळे बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयातील आरक्षण आता १0३ टक्क्यांपयर्ंत पोहोचले आहे. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कसा प्रवेश द्यायचा, असा पेच निर्माण होणार आहे.
No comments:
Post a Comment