हैद्राबाद,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची कीर्ती महाराष्ट्रबाहेरच नव्हे तर सर्व जगभर ज्ञात आहे. या त्यांच्या कार्याने भारावून गेलेल्या गलाई बांधवांनी हैद्राबाद येथे भव्य शिवजयंती साजरी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सजवलेल्या रथामध्ये ठेवून शहरातून भव्य मिरवणूक काढली. मिरवणुकीसमोर अष्टविनायक झांज पथक मणेराजुरी (तासगाव )यांनी आपला कलाविष्कार दाखवून हैद्राबादकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. झांजच्या तालाने तरुणांमध्ये उत्साह भरला. महाराष्ट्रातील शिक्षणाच्या निमित्ताने हैद्राबादमध्ये आलेले असंख्य तरुण ,तरुणी या उत्सवामध्ये सहभागी झाले. यामुळे हैद्राबादमध्ये भगवे वादळ दिसत होते. महाराष्ट्रीयन कोल्हापुरी फेटा,सलवार-कुर्ता, गळ्यामध्ये भगवे उपरणे,छातीवर शिवछत्रपतींचा फोटो असलेले बॅजेस ,शेकडो झेंडे व हजारो पताका यामुळे वातावरण पूर्णपणे शिवमय झाले होते.
मिरवणुकीमध्ये बाल शिवाजी ची भूमिका साकारलेला चि.सोहम प्रशांत चव्हाण हा सर्वांच्या कौतुकाचा विषय झाला. मिरवणुकीची सांगता सभेमध्ये रुपांतरीत झाली.यावेळी इयत्ता चौथीत शिकणाऱ्या कु.अमृता सोनवले हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाष्य करून सर्वांना अचंबित केले. त्याचबरोबर तरुणांमध्ये आत्मविश्वास जागवणारे बार्शी येथील प्रबोधनकार देवा शिंदे यांनी छत्रपतींच्या मावळ्यांना उद्देशून अभ्यासपूर्ण भाषण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा मधील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला हैद्राबाद मधील व्यापारी, दुकानदार,राजकीय पुढारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेविका शशीकुमारी, गुलाबसिंग रजपुत (टी आर एस लीडर ) सुरवेंदरसिंग, आनंद कौर ,याचबरोबर असंख्य मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन पुजारी यांनी केले तर आभार आण्णासाहेब बागल यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश पाटील यांनी केले.
शिवजयंती दिमाखदारपणे साजरी करण्यासाठी बाळासाहेब चव्हाण, सचिन सावंत, रमेश चव्हाण , दादासाहेब कोडग, रमेश माने, महेश जाधव, महादेव कोडग, अमोल बिडवे, आकाश पाटील, शरद भोसले , श्री.पाटील, महेश जाधव पाटील, शांतकुमार शिंदे , महेश शिंदे , समिर वंजारी , सच्चिदानंद देसाई त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व गलाई बांधवांनी विशेष मेहनत घेतली.व्यवसायाच्या निमित्ताने हैद्राबाद येथे स्थायिक झालेल्या शिवप्रेमी गलाई बांधवाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment