Wednesday, February 20, 2019

रात्री आमच्या घरासमोरून का फिरतोस म्हणून मारहाण करून एकाचा खून

जत,(प्रतिनिधी)-
रात्री - अपरात्री आमच्या घरासमोरून का फिरतोस असा  जाब विचारून व इतर किरकोळ कारणावरून लोखंडी राँड व काठीने बेदम मारहाण करून अविनाश शिवाजी  साळुंखे ( वय ३० रा.  विठ्ठल नगर ,तुरेवाले प्लाँट , जत ) या सेंट्रींग कामगाराचा निर्घृणपणे खून केल्याच्या आरोपावरून पृथ्वीराज शंकर निकम ( वय १९ ) , विकास  उर्फ सोनू बाळासाहेब भोसले ( २६ ) , आकाश उर्फ मोनू बाळासाहेब भोसले ( २४ ) सर्व राहणार विठ्ठल नगर , तुरेवाले प्लाँट  जत या तीन  जणांच्या विरोधात  गुन्हा दाखल करून जत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे . ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान विठ्ठल नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी मयत अविनाश याची पत्नी कविता अविनाश साळुंखे  ( वय २५ ) हिने फिर्याद  दाखल केली आहे.

       याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की सोमवार दिनांक १८  फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान अविनाश साळुंखे हा गावातून घरी जात असताना पृथ्वीराज निकम , विकास भोसले व आकास भोसले या तिघांनी त्याला आडवून  तू एवढ्या रात्री अपरात्री  इकडे तिकडे कुठे फिरतोस असा जाब विचारून त्याला थांबवले .तो कांहीच बोलत नाही म्हटल्यानंतर या तिघानी मिळून त्याला शिवीगाळ व दमदाटी करून लोखंडी राँड आणि काठीने बेदम मारहाण केली . त्यानंतर  गंभीर जखमी आवस्थेत  अविनाश हा तसाच घरी जावून झोपला होता. मंगळवारी सकाळी त्याची पत्नी कविता ही त्याला उठविण्यासाठी गेली असता तो कांहीच बोलत नव्हता . त्याच्या कानातून व नाकातून रक्त बाहेर येत होते त्यामुळे उपचारासाठी त्याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते . उपचार सुरू असताना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.  त्यानंतर रात्री उशिरा वरील तीन संशयित आरोपीच्या विरोधात जत पोलिसात   गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते . आज  ( बुधवार ) त्यांना अटक करून न्ययालयात उभे केले असता  दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन गढवे करत आहेत .
  दरम्यान, या खून प्रकरणातील संशयित आरोपी विकास व आकाश हे दोघे सख्येभाऊ आहेत. पृथ्वीराज व विकास हे दोघेजण दुचाकीवर फिरून  भांडी विक्री व्यवसाय करतात तर आकाश याचे जत शहरातील सोलंनकर चौकात मोबाईल दुरुस्ती आणि विक्री करण्याचा व्यवसाय आहे .

No comments:

Post a Comment