Tuesday, February 12, 2019

मयुरी लांडगे शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील डफळापूर येथील जि.प. प्राथमिक मुलींची शाळा नं.2 मध्ये इयत्ता सातवी पर्यंत शिकलेलीआणि आता  8 वीला डफळापूर हायस्कूल मध्ये शिकणारी मयुरी प्रशांत लांडगे हीचा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2018-19 मध्ये जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवून शिष्यवृत्तीधारक झाली आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा कोणत्याही खाजगी शाळेपेक्षा गुणवत्तेत कमी नाहीत याची उदाहणे बऱ्याच वेळा पाहण्यास मिळतात,त्यापैकीच एक म्हणजे इयत्ता पहिलीपासून सातवी पर्यंत डफळापुर च्या जि.प. शाळेमध्ये शिकलेली मुलगी केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती प्रकारामध्ये जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आली आहे .या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्याला चार वर्षांमध्ये 48 हजार रुपये शिष्यवृत्ती स्वरूपात मिळतात. सदर विद्यार्थिनी शिष्यवृत्ती धारक झाली म्हणून शाळेत शाळेमार्फत व केंद्रामार्फत केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर बेले यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ती म्हणाली की, जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळालेल्या बेसिक गोष्टीचा फायदा निश्चितच मला या परीक्षेमध्ये झाला व इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असा तुम्हीही अभ्यास करून यशस्वी व्हा. अशा पद्धतीने संदेश तिने दिला. यावेळी केंद्रप्रमुखांनी तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत इतर मुलांनाही तुम्हीही याच पद्धतीने अभ्यास करून आपल्या शाळेचे,आपल्या गावाचे,आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल करा, असा संदेश दिला. सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा कोरे, शंकर कुंभार, अजंता लोंढे, आरती कांबळे, उद्योगरत्न संकपाळ, जयश्री मगदूम, मनीषा शिंत्रे हे सर्व शिक्षक उपस्थित होते.

1 comment: