जामीनावर सोडण्याच्या कारणावरून आणि
विरुद्ध पार्टीच्या इसमावर गुन्हा दाखल करण्याकरिता तीन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी
जत पोलिस ठाण्याचा पोलिस हवालदार राजू कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आज (दि.12) आला. तक्रारदाराने 23 नोव्हेंबर 2018 रोजी लाचलुचपत खात्याकडे तक्रार दिली होती.
एका तक्रारीनुसार पडताळणीमध्ये राजू
कांबळे याने तक्रारदार यांच्याकडे तीन हजाराची मागणी केली होती. आणि शेवटी तडजोडीत दोन हजार देण्याचे ठरले होते.
त्यानुसार कांबळे याच्याभोवती सापळा लावला असता कांबळेने लाचेची रक्कम
स्वीकारली नाही. मात्र पडताळणीमध्ये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न
झाल्याने कांबळे याच्या विरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस उप आयुक्त
संदीप दिवाण, पोलिस अधिक्षक राजकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस उप अधिक्षक राजेंद्र साळुंखे, पोलिस कर्मचारी जितेंद्र
काळे, भास्कर भोरे, संजय कलगुटगी,
संजय संकपाळ, अविनाश सागर, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.
No comments:
Post a Comment