मित्रांनो, आपण श्रीमंत व्हावं, आपल्याकडे भरपूर पैसा यावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण पगार कमी असतो, त्याच वेळी उत्पन्न कमी असल्यानं आपण श्रीमंत होणार नाही, असंही वाटून जातं. परंतु हा विचार डोक्यातून काढून टाका. दीर्घकाळासाठी नियमितपणे थोडा-थोडा पैसा गुंतवला तर श्रीमंती तुमच्याकडे चालत येईल. यासाठी नेमकं काय करायला हवं, जाणून घेऊ..
1) शेअर बाजारातली गुंतवणूक जोखमीची असली तरी श्रीमंत होण्यासाठी थोडा धोका पत्करण्याची तयारी ठेवायला हवी. शेअर्स, म्युच्युअल फंड, ईएलएसएस फंडांमध्ये गुंतवणूक केल्याने पैसा वेगाने वाढेल. गुंतवणुकीच्या पारंपरिक पर्यायांपेक्षा इक्विटीतून खूप चांगला परतावा मिळतो. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इक्विटीत गुंतवणूक करू शकता.
2) मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज घ्या. भविष्यात मालमत्तेची किंमत वाढते. इतकंच नाही तर ती भाड्याने देऊनही चांगलं उत्पन्न मिळू शकतं.
3) भरपूर पैसे असले तरी जीवन आणि आरोग्य विमा घ्यायला विसरू नका. वाढता आरोग्य खर्च पाहता आरोग्य विम्याला पर्याय नाही. कुटुंबाच्या सुरक्षेसाठीही जीवन विमा करून घ्यायला हवा.
No comments:
Post a Comment