Sunday, February 3, 2019

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ जोमाने चालवण्याची गरज: भूपेंद्र कांबळे


जत,(प्रतिनिधी)-
आजही बहुजन समाजात अंधश्रद्धा कायम असून त्यामुळे समाज अधोगतीला चालला आहे. विज्ञान युगात समाजाला बरोबरीने आणण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ वाढवण्याची गरज आहे. तालुक्यात या चळवळीला गती येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जत नगरपालिकेचे बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे यांनी जत येथे बोलताना केले.
जत येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 च्या सभागृहात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी बसपचे जिल्हा नेते अतुल कांबळे होते.

यावेळी तालुक्याची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. समितीचे जिल्ह्याचे कार्यकर्ते अवधूत कांबळे, अजित भालेकर उपस्थित होते. यावेळी अंधश्रद्धा समितीचे कार्य आणि दिशा स्पष्ट करण्यात आली. इब्राइम नदाफ यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, यापूर्वी जत तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ जोमाने चालत होती. येथील बुवाबाजी कमी करण्याचा प्रयत्न झाला. पण अलिकडच्या काही वर्षात ही चळवळ थंडावली आहे. आता पुन्हा ही चळवळ जोमाने कामाला लागावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी जत तालुका अंधश्रद्धा समितीच्या तालुकाध्यक्षपदी प्रभाकर सनमडीकर यांची व उपाध्यक्षपदी जक्काप्पा सर्जे यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारणी अशी: कार्याध्यक्ष इब्राइम नदाफ, प्रधान सचिव-अण्णा भिसे, सुनील क्यातन, बुवाबाजी विभाग- दीपक कांबळे,कायदा विभाग-उमेश थोरात याशिवाय अन्य विभाग प्रमुखांची निवड करण्यात आली. यावेळी जत नगर पालिकेचे बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे, बसप चे जिल्हा उपाध्यक्ष अतुल कांबळे, बसप तालुकाध्यक्ष तानाजी व्हनखंडे, प्रभाकर सनमडीकर, दत्तात्रय शिंदे, इब्राईम नदाफ,मच्छिंद्र ऐनापुरे, सुनील सूर्यवंशी, रोहन साळे, संजय साळे, बाबासाहेब काटे, सुनील क्यातन, कुमार कोळी, संतोष गेजगे,मेसाप्पा काटे, दीपक कांबळे, भूपेंद्र बाबासाहेब कांबळे, चंद्रकांत बंडगर, अण्णासाहेब हारगे, सुदर्शन बंडगर, उमेश थोरात, गजानन ऐवळे, अरविंद शेलार, एस. पी. शिवशरण,जकाप्पा सर्जे,आयुब सय्यद, श्री. वाघमोडे,रुपेश शिंदे आदी उपस्थित होते. आभार रवी सांगोलकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment