जत,प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाची बारावीची परीक्षा गुरूवारी सुरू झाली. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. जिल्ह्यात 45 केंद्रांवर 37 हजार 349 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दहावीची परीक्षा दि. 1 मार्चपासून सुरू होत आहे. जत शहरासह तालुक्यातील उमदी आणि संख येथे परीक्षा उत्साहात सुरू झाली.
विद्यार्थी जीवनात बारावीच्या परीक्षेला अतिशय महत्व आहे. विद्यार्थी व पालकांसाठी ही परीक्षा महत्वाची असते. त्यामुळे या परीक्षेचे विद्यार्थी आणि पालकांनाही टेन्शन असते. गुरूवारी बारावीचा पहिला पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा-पाऊण तास अगोदरच विद्यार्थी व पालक परीक्षा केंद्राबाहेर जमा झाले होते. विद्यार्थ्यांची तपासणी करून परीक्षा केंद्रात सोडले जात होते.
बारावी परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत आहे. जिल्ह्यात 45 केंद्रांवर 37 हजार 349 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शिराळा केंद्र उपद्रवी, तर संख नं. 1 हे परीक्षा केंद्र कुप्रसिद्ध म्हणून घोषित केलेले आहे. भरारी पथकांनी काही परीक्षा केंद्रांना भेट दिली.
दहावीची परीक्षा दि. 1 ते 22 मार्चला होणार आहे. जिल्ह्यात 103 केंद्रांवर 41 हजार 729 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मालगाव, शिराळा नं.1, वाळवा, येलूर, कुची ही पाच परीक्षा केंद्रे उपद्रवी, तर एरंडोली, मिरज नं. 1, भवानीनगर, उमदी, कवठेमहांकाळ ही पाच परीक्षा केंद्रे कुप्रसिद्ध म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
No comments:
Post a Comment