जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे जम्मूहून श्रीनगरला जाणार्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ( सिआरपीएफ ) ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचा जत शहर व तालुक्यातील प्रमुख गावे बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला व शहीद जवानांना आदरांजली आर्पण करण्यात आली .
अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बंद होते. बंद कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातून निषेध फेरी व मोटरसायकल रँली काढून दहशतवाद्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून पाकिस्तान विरोधी निषेधाच्या घोषना दिल्या.या निषेध फेरीत उत्तम चव्हाण , गणेश गिड्डे , सचिन मदने , मुन्ना पखाली , विजय चव्हाण , आदीजण सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment