नागपूर,(प्रतिनिधी))-
ज्याला ओळखतच नाही, अशा व्यक्तीसोबत फेसबुकवर मैत्री केली जाते. या मैत्रीच्या माध्यमातून मोठा फटका बसत असला तरी मैत्रीसाठी आणि लाईक मिळविण्यासाठी अनेक जन आतुर असतात. सर्वस्व गमावून बसल्यानंतर जाग येते. असे अनेक प्रकार उघडकीस आले. मात्र, पुढच्याला ठेच लागली की मागचा शहाणा होतो, अशी म्हण आहे. मात्र, याबाबतीत असे होताना दिसत नाही. असाच काहीसा प्रकार गिट्टीखदान ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला.
फेसबुक मैत्रिणीने लग्नास नकार दिला म्हणून त्या मित्राने चक्क तिचे अश्लिल छायाचित्रे वायरल केली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा नोंदवून अक्षय उर्फ रणविजय शेखर गणवीर (रा. कॉसमॉस सोसायटी, सोमलवाडा) यास अटक केली.
सारेच फेसबुक मित्र असे असतात असेही नाही. मात्र, अलिकडे उघडकीस आलेल्या घटनांमुळे एफबी मित्राकडून प्रेमाची किंवा मैत्रीची अपेक्षा करीत असला तर सावधान. ३९ वर्षीय पीडित महिला ही सेल्समनचे काम करते. तिच्या पतीचा मृत्यू झाला असून तिला मुले आहेत. १ जानेवारी २0१८ रोजी तिची फेसबुकच्या माध्यमातून अक्षय उर्फ रणविजयची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री होऊन शारीरिक संबंध देखील प्रस्थापित झाले. त्यानंतर त्याने तिला लग्नाची गळ घातली. परंतु, तिने लग्नास नकार दिला. त्यामुळे तो संतप्त झाला. त्यानंतर त्याने तिची ईल छायाचित्रे महिलेच्या मुलांना आणि इतर नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठवून तिची बदनामी केली. त्याचप्रमाणे तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तरीही तिने लग्नास नकार दिला असता तिच्या मुलांना मारण्याची त्याने धमकी दिली. केवळ एक वर्षाच्या मैत्रीत हा सारा प्रकार घडला. सततच्या त्रासाला कंटाळून आणि भीतीमुळे तिने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात धाव घेतली. सारा प्रकार पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपी अक्षय यास अटक केली.
No comments:
Post a Comment