सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. अभिजीत चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. वि. ना. काळम यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. अभिजीत चौधरी हे मूळचे भुसावळ (जि. जळगाव) येथील आहेत. ते 2008 मध्ये के. ई. एम. मधून एम.बी.बी.एस. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. 2010 मध्ये ते आय.पी.एस. झाले. त्यानंतर 2011 मध्ये ते आय.ए.एस. झाले. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथून अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेस प्रारंभ केला. त्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नंतर भंडारा जिल्हाधिकारी पदावर त्यांनी काम केले आहे. एप्रिल 2017 पासून ते कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
No comments:
Post a Comment