Thursday, February 28, 2019

नोकरीच्या आमिषाने तरुणांना 5 लाखांचा गंडा



जयसिंगपूर,(प्रतिनिधी)-
 मित्राच्या पुतण्याला व पत्नीला शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे नोकरी लावतो, अशी बतावणी करून संजय श्रीकांत आमणे (रा. कोष्टी गल्ली, पेठवडगाव, ता हातकणंगले) याने दोन मित्रांना तब्बल 5 लाख रुपयांचा चुना लावून फसवणूक केली. याबाबतची फिर्याद रमेश दत्तात्रय टोपकर (दाभाडे) व पंढरीनाथ विष्णू मिरजे (दोघे रा. पेठवडगाव) यांनी वडगाव पोलीस ठाण्यात दिली.
कोल्हापूर येथील पंत वालावलकर हायस्कूलमध्ये संशयित संजय आमने मुख्याध्यापकपदावर काम करतो. शिवाजी विद्यापीठातील शिक्षण विभागाचे उपसंचालक व माझे जिव्हाळाचे संबंध असून त्यांच्यातर्फे अनेक मुलांना नोकरी लावली आहे, असे संजय आमणे म्हणत असे. रमेश टोपकर यांच्या पुतण्याला व पंढरीनाथ मिरजे यांच्या पत्नीला नोकरीस लावतोअशी बतावणी आमणे याने करून दोघांकडून 5 लाख रुपये उकळले. दरम्यान, ठरलेल्या मुदतीत नोकरीची ऑर्डर दिली नाही. नोकरीबाबत विचारणा केल्यावर आमणे हा टाळाटाळ करू लागला. म्हणून दाभाडे व मिरजे यांनी नोकरीऐवजी दिलेली रक्कम मागणीसाठी आमणे यांचेकडे तगादा लावला. दरम्यान, आमणे यांनी रकमेपोटी स्वतःचे नावे असलेले चेक दिले. ते चेक बँकेतून न वटल्याने आपली फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. म्हणून टोपकर व मिरजे यांनी आमणे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मालगुंडे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment