सातारा,(प्रतिनिधी)-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खंडाळा जि. सातारा येथे सोमवारी जीवे मारण्यासंबंधीची पोस्ट एकाने रविवारी फेसबुकवर टाकल्याने खळबळ उडाली. हा मॅसेज व्हायरल होऊ लागल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. 'अजितदादा बच गया, अब सातारा मे सीएम मरेगा', अशा आशयाच्या मेसेजने सातारा पोलिस हडबडून गेले असून, गुप्तचर यंत्रणाही तपासाला लागली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसह असंख्य लोकांना मारले जाणार असल्याचेही फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फेसबुकवरील एकाच्या अकाउंटवर ही पोस्ट पडली आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या आशयाच्या दोन पोस्ट टाकण्यात आल्या असून त्यासह एका पक्षाच्या कार्यक्रमाचे फोटोही टाकण्यात आले आहेत. फेसबुकवरील या दोन्ही पोस्ट वाचल्यानंतर वाचणार्याच्या पायाखालची वाळू सरकत आहे. या दोन्ही पोस्टमध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे होणार्या कार्यक्रमासंबंधी टिप्पणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांसह किमान ४0 हजार सातारकरांचा खात्मा करणार असल्याचाही उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, या पोस्टमध्ये 'आय एम अजमल कसाब. कल अजितदादा बच गया. अब सातारा मे सीएम मरेगा. २६/११ आतंकवादी हमला वैसे अब ऑपरेशन सातारा सीएम और ४0,000 लोग खलास. ४ फेब्रुवारी २0१९ खंडाला, सातारा इलेक्शन दौरा', असा पोस्टमधील मजकुराचा आशय आहे. याशिवाय आणखी एक अशाच पद्धतीची मोठी पोस्ट फेसबुकवर संबंधिताच्या अकाउंटवर पडलेली आहे.
या सर्व प्रकाराची माहिती सातार्यात वार्यासारखी पसरल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यांनी तत्काळ माहिती मिळवून चौकशीला सुरुवात केली आहे. यामुळे तो मॅसेज टाकणारा तोच व्यक्ती आहे का? मॅसेज टाकण्यामागे हेतू काय आहे? फेसबुक अकांउट हॅक झाले आहे का? फेसबुक अकाउंट खरे आहे का? पोलिस या घटनेचा कधी व कसा पर्दाफाश करणार? असे सवाल उपस्थित होत आहेत.
No comments:
Post a Comment