Wednesday, February 27, 2019

कसं व्हायचं श्रीमंत?

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर अठराव्या वर्षापासूनच मनी मॅनेजमेंट शिकले पाहिजे. स्वत:चं घरगाडी आणि चांगली जीवनशैली असावीअसा विचार प्रत्येक युवा करत असतो. पण फक्त विचार करून भागत नाहीप्रयत्न करावे लागतात. मनी मॅनेजमेंट करावं लागतं. विसाव्या वर्षानंतर असं नियोजन केलं तर तिशीपर्यंत तुम्ही बरेच पैसे कमवू शकता.
विसाव्या वर्षानंतर उत्पन्नातला मोठा हिस्सा वाचवायला हवा. हे पैसे गुंतवायला हवेत. आपल्या उत्पन्नातला एक हिस्सा वेगळ्या खात्यात ठेवा. आर्थिक चणचण आली तरी त्याचा वापर करू नका. ही बचत भविष्यात उपयुक्त ठरू शकेल.
कमी वयात योग्य निर्णय घ्या. विसाव्या वर्षी कुणी आर्थिक नियोजनाचा विचार करत नाही. पण या वयात फारशा जबाबदार्‍या नसल्याने पैसे वाचवणं सोपं जातं. 

कमी वयात लाईफस्टाईलवर फार पैसे खर्च करू नकादिखावा करू नका. पैसे आले की गरजेच्या वस्तू खरेदी करा. लाईफस्टाईलच्या नादात पैेशांची उधळपट्टी क़रू नका.
पदवी मिळाल्यानंतर नोकरी शोधायला सुरुवात करा. लवकर कमवायला लागा. शिक्षण घेता घेताही कमाई करता येईल. विसाव्या वर्षी १५ हजार रुपये कमवत असाल तर तिशीपर्यंत यात ५00 टक्के वाढ होणं गरजेचं आहे. नोकरीसोबतच इतर काही पर्याय निवडता येतील. पार्ट टाईम नोकर्‍या किंवा मार्केटिंगचा व्यवसाय करता येईल.
रिअँलिटीस्टॉक मार्केटसारख्या क्षेत्रात काम करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.
श्रीमंत बनण्यासाठी फक्त विचार करून भागत नाही. तुमचे विचार कृतीतही उतरले पाहिजेत. पैशांबाबतचे आपले विचार तुम्ही बदला. योग्य नियोजन आणि विचार करून तुम्ही श्रीमंत बनू शकता.

No comments:

Post a Comment