Thursday, February 21, 2019

संख येथे महात्मा बसवेश्वर पुतळयाच्या कामाचे भूमिपूजन

(नियोजित संत बसवेश्वर यांचा पुतळा)
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील संख  येथील बसवेश्वर चौकात
लिंगायत धर्माचे संस्थापक व आद्य गुरू  जगदज्योति महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पूर्णाकृती भव्य असा पुतळा उभारण्यासाठी चबुतरा बांधण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन विविध मान्यवर स्वामीजींच्या हस्ते सोमवार दिनांक २५ रोजी सकाळी साडेदहा वाजता संपन्न होणार आहे. त्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे, आवाहन पुतळा समितीकडून करण्यात आले आहे.

    संख -विजयपूर रोडवरील मुख्य बसवेश्वर चौकात भव्य असा महात्मा बसवेश्वर पुतळा बसवण्यात येणार आहे. त्याकामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यासाठी कुडलसंगम लिंगायत पंचमसाली जगद्गुरू महापिठाचे श्री श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी,बिळूर मठाचे मुरघेन्द्र महास्वामीजी, गच्चीन मठ अथणीचे शिवबसव महास्वामीजी,गुरुदेव आश्रम बालगावचे  प. पू. अमृतानंद महास्वामीजी,ककमरी येथील रायलिंगेश्वर मठाचे मठाधिपती  प पू अभिनव महाराज, बसवन बागेवाडीचे सिद्धलिंग महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थित  भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार  असल्याची माहिती पुतळा समितीचे प्रमुख गुरुबसव पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले की. महात्मा बसवेश्वर महाराजांच्या या पुतळ्यामुळे संख आणि परिसराच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे. येथे येणारे विद्यार्थी व नागरिकांना महाराजांकडे पाहून प्रेरणा मिळेल.

No comments:

Post a Comment