Saturday, February 9, 2019

पक्षीसुद्धा घेतात घटस्फोट

माणूस लग्न करतो आणि नवरा-बायकोत होणार्‍या विसंवादामुळे घटस्फोट घेऊन लग्नबंधनातून सुटकाही करून घेऊ शकतो. पक्षी जगतातही असे घडत असेल काय असे कुतूहल अनेकांना असेल. अलिगड मुस्लीम विद्यापीठातील वाईल्ड लाईफ विभागाचे प्रोफेसर याहया यांनी तब्बल ४0 वर्षे या विषयावर संशोधन करून मनोरंजक माहिती गोळा केली आहे.

याहया यांच्या मते पक्षी जगतातही घटस्फोट होतात. मात्र घटस्फोट बहुतेक वेळा पक्षीणी देतात. पक्ष्यांच्या काही प्रजातीत हा प्रकार घडतो. हॉर्नबील, वॉरबेट प्रजातीचे पक्षी, स्कॉटलंड येथे आढळणारे कॅलिको, आपल्याकडील सुगरण, बाया, मोर, अमेरिकेतील मॉकिग बर्ड, वर्ल्ड ऑफ पॅराडाईज हे पक्षी घटस्फोट देतात म्हणजे आपला जोडीदार सोडून दुसरा जोडीदार निवडतात. मात्र ऑस्ट्रेलियातील डोंगरी कावळे, सौदीतील सारस पक्षी एकदा जोडीदार निवडला की सगळे आयुष्य त्याच्याचबरोबर काढतात. भारतातील सुगरण पक्ष्यात नरच घरटे बांधतो आणि घरटे पसंत पडले तर सुगरण पक्षीण त्याच्याशी घरोबा करते. अनेकवेळा दुसर्‍या नराचे घरटे आवडले तर पहिल्याला सोडचिठ्ठीही देते. मोर ही लांडोरीला आकर्षित करण्यासाठी नाना प्रकारे रिझवतो. अमेरिकन मॉकिग बर्डची मादी एकापेक्षा अनेक नरांबरोबर संसार मांडते.
पक्ष्यांत घटस्फोट होण्याची कारणे दुसरा नर आवडणे, अपघात, मुळातच चुकीचा जोडीदार निवडणे अशी असतात असेही याहाया यांचे निरीक्षण आहे. विशेष म्हणजे पक्ष्यांना काडीमोडासाठी न्यायालयात जावे लागत नसल्याने त्यांचे घटस्फोट विनाविलंब होतात.अलिगड : माणूस लग्न करतो आणि नवरा-बायकोत होणार्‍या विसंवादामुळे घटस्फोट घेऊन लग्नबंधनातून सुटकाही करून घेऊ शकतो. पक्षी जगतातही असे घडत असेल काय असे कुतूहल अनेकांना असेल. अलिगड मुस्लीम विद्यापीठातील वाईल्ड लाईफ विभागाचे प्रोफेसर याहया यांनी तब्बल ४0 वर्षे या विषयावर संशोधन करून मनोरंजक माहिती गोळा केली आहे.
याहया यांच्या मते पक्षी जगतातही घटस्फोट होतात. मात्र घटस्फोट बहुतेक वेळा पक्षीणी देतात. पक्ष्यांच्या काही प्रजातीत हा प्रकार घडतो. हॉर्नबील, वॉरबेट प्रजातीचे पक्षी, स्कॉटलंड येथे आढळणारे कॅलिको, आपल्याकडील सुगरण, बाया, मोर, अमेरिकेतील मॉकिग बर्ड, वर्ल्ड ऑफ पॅराडाईज हे पक्षी घटस्फोट देतात म्हणजे आपला जोडीदार सोडून दुसरा जोडीदार निवडतात. मात्र ऑस्ट्रेलियातील डोंगरी कावळे, सौदीतील सारस पक्षी एकदा जोडीदार निवडला की सगळे आयुष्य त्याच्याचबरोबर काढतात. भारतातील सुगरण पक्ष्यात नरच घरटे बांधतो आणि घरटे पसंत पडले तर सुगरण पक्षीण त्याच्याशी घरोबा करते. अनेकवेळा दुसर्‍या नराचे घरटे आवडले तर पहिल्याला सोडचिठ्ठीही देते. मोर ही लांडोरीला आकर्षित करण्यासाठी नाना प्रकारे रिझवतो. अमेरिकन मॉकिग बर्डची मादी एकापेक्षा अनेक नरांबरोबर संसार मांडते.
पक्ष्यांत घटस्फोट होण्याची कारणे दुसरा नर आवडणे, अपघात, मुळातच चुकीचा जोडीदार निवडणे अशी असतात असेही याहाया यांचे निरीक्षण आहे. विशेष म्हणजे पक्ष्यांना काडीमोडासाठी न्यायालयात जावे लागत नसल्याने त्यांचे घटस्फोट विनाविलंब होतात.

No comments:

Post a Comment