जत,(प्रतिनिधी)-
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून राहूल दत्तात्रय काळे ( वय २९ रा.मेंढपाळ नगर जत ) या गावगुंडाने धारदार चाकूने हल्ला करून विलास विठोबा देवकते ( वय ५० रा.देवकाते काँलनी जत ) या वयोवृद्ध नागरिकांस गंभीर जखमी केल्याच्या आरोपावरून काळे याच्या विरोधात स्वतः देवकाते यानी सोमवारी रात्री उशिरा जत पोलीसात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान देवकाते काँलनी परिसरात घडली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की , राहुल काळे व विलास देवकते यांची तोंडओळख होती . राहुल काळे हा गुंड म्हणून या परिसरात परिचित आहे . या ओळखीमुळे त्याने विलास देवकाते यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली होती.पैसे देण्यास नकार दिल्यानंतर राहुल काळे याने त्याच्या दंडावर व पायाच्या पिंडरीवर चाकुने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी स्वतः विलास देवकते यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे . पोलिसांनी राहुल काळे यास अटक करून आज जत न्यायालय उभे केले असता त्याचा जामीन नामंजूर करून त्याला कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत . या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस.ए.कणसे करत आहेत.
No comments:
Post a Comment