Monday, February 25, 2019

बारावीच्या मुलीच्या अपहरणात शेगावच्या मुलाचा सहभाग


जत,(प्रतिनिधी)-
बारावीचा पेपर देऊन घरी चाललेल्या तरुणीचा सात तरुणांनी पंढरपुरातून अपहरण करण्याची घटना शनिवारी घडली. मात्र पालकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे एकतर्फी प्रेमप्रकरणातून करण्यात आलेल्या अपहरण करण्यात आलेल्या मुलीची सुटका झाली. रात्रभरच्या शोध मोहिमेतून सातार्यात मुलगी सापडली.यातील सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून एक संशयीत अरोपी फरार आहे. यातील एक रोहित संजय भोसले (वय 20) हा जत तालुक्यातील शेगाव गावचा रहिवाशी आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

शनिवारी बारावीचा मराठीचा पेपर सुटल्यानंतर पंढरपुरातील पखालपूर गणपती मंदिराजवळ ही घटना घडली. एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्रभर मोहिम राबवल्यानंतर सातार्यात अपहरणकर्ते आणि मुलगी मिळून आली. याप्रकरणी सहाजणांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय बोलेरो आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. सुधाकर ऊर्फ जनार्धन दत्तात्रय साळुंके (वय 26), हनुमम्त दत्तात्रय साळुंके (वय 22, दोघे रा. उंबरगाव), रोहित संजय भोसले (वय 20,शेगाव, ता.जत) परमेश्वर दाजी शिंदे (23, आंबे,ता. पंढरपूर) अकबर मदार मकानदार (23,सिद्धापूर, ता. मंगळवेढा) अशी संशयीतांची नावे असून आणखी एक संशयीत आबा उर्फ भगवंत प्रताप साळुंके (रा. उंबरगाव) हा गायब आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
शनिवारी जाधववाडी येथील बबिता (नाव बदलले आहे) ही 18 वर्षे पूर्ण झालेली तरुणी राजाराम इंग्लिश स्कूलमध्ये आली होती. पेपर सुटल्यानंतर नातेवाईकासह दुचाकीवरून गावी जाताना पखालपूर गणपती मंदिराजवळ अचानक पांढर्या रंगाची बोलेरो, काळ्या रंगाची मोटारसायकल त्यांच्या दुचाकीसह आडवी आली. काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून बबिताच्या आत्याची मुले सुधाकर आणि हनुमम्त साळुंके ही खाली उतरली. गाडीत काही अनोळखी तरुणही होते. साळुंके बंधूंनी त्यांच्या मदतीने जबरदस्तीने तिला गाडीत बसवले. तेथून वेगात ते निघून गेले. त्या नातेवाईकाने तातडीने मुलीच्या वडिलांना मोबाईलवरून कळवले. काही वेळात तो गावाकडे परतला. नातेवाईकांना सांगून तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून अपहरणकर्त्यांचा तपास सुरू केला. सातारा भागातील लोकेशन मिळाले. पोलिसांची पथके तयार करून ती शोधासाठी पाठवली.
दरम्यान,सातारा पोलिसांचा तालुका पोलिसांना फोन आला. पहाटे तीनच्या सुमारास गस्ती पथकाला संशयास्पद बोलेरो ताब्यात घेतली असून यातील तरुणाम्ची चौकशी केली त्यात मुलीच्या अपहरणाचे प्रकरण उघडकीस आले आहे. लगेच तालुका पोलिसही सातार्यात दाखल झाले. त्यांनी मुलीसह संशयितांना ताब्यात घेतले.नंतर मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आले.




No comments:

Post a Comment