Thursday, February 28, 2019

पाण्याचा टँकर उलटल्याने चालक ठार


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील अंकलगी -करजगी रस्त्यावर पाणीपुरवठा करणारा टँकर उलटून अपघात झाला. त्यामध्ये चालक संजय उत्तम माळी (वय 36 रा. कुंभारी, ता. जत) ठार झाला; तर क्लिनर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. हा अपघात रात्री झाला. उमदी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.
पूर्वभागातील संख येथील वाड्या-वस्त्यांवर कवठेमहंकाळ येथील टँकरने (एमएच 10 बी आर 6028) पाणीपुरवठा 26 फेब्रुवारीपासून सुरू होता.अंकलगी तलावातून भरून वाड्या-वस्तीवर पाणीपुरवठा केला जात होता. रात्री वीजपुरवठा असल्याने पाणी भरण्यासाठी चाललेला होता. अंकलगी-करजगी रस्त्यावर वळणावर टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला क्लिनर साईडला उलटला. त्यामध्ये चालक संजय माळी गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला, छातीला दुखापत झाली. जागेवरच कानातून व तोंडातून रक्त जाऊन बेशुद्ध झाला. त्याच अवस्थेत रात्री मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजता त्याचे निधन झाले.

No comments:

Post a Comment