जत,(प्रतिनिधी)-
सध्या शहरांत गॅस गिझर प्रत्येक
कुटुंबाच्या दैनंदिन जीवनात घटक बनला आहे. विजेचे वाढलेले दर,
भारनियमनामुळे असलेली विजेची अनियमितता यामुळे जास्तीत जास्त नागरिक
इलेक्ट्रीक गिझरपेक्षा गॅस गिझरला पसंदी देत असल्याचे चित्र आहे. परंतु, गॅस गिझर वापरताना अनेकदा पुरेशी सावधानता बाळगली
जात नाही. तसेच त्याचे धोके अधिक आहेत, याकडेही दुर्लक्ष केले जाते.त्यामुळे थोडेफार पैसे वाचवण्याच्या
मोहापायी हा जीवाशी खेळ होत आहे.
काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातल्या
एका कुटुंबाच्या बाथरूममधील गॅस गिझरमुळे दोन भावांचा गुदमरून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर गॅस गिझर वापरताना
काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, ही गोष्ट लक्षात येते.
गिझर खराब झाल्यास त्यामधून अपूर्ण ज्वलन होते. यामुळे बाहेर पडणार्या कार्बन डायऑक्साईडचे रुपांतर
कार्बन मोनॉक्साईडमध्ये होते. गिझरचा बर्नर खराब झाल्यास त्याची
ज्योत पिवळी दिसते. तसेच गिझर चालू केल्यानंतर भिंतीवर काजळी
यायला लागते.
गॅस गिझरची नेमकी काळजी कशी घ्यावी
भिंतीवर काजळी येत असल्यास गॅस बर्नर
साफ करावा.
गिझर खिडकीजवळ हवेच्या संपर्कात बसवणे
गरजेचे आहे.
बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन आवश्य बसवा.
सिलिंडर बाथरूमच्या बाहेर ठेवावा.
बाथरूममध्ये हवा खेळती राहील याकडे लक्ष
द्यावे.
No comments:
Post a Comment